प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निर्धार मेळावा संपन्न..
दिनांक २६ सप्टेंबर,श्रीगोंदा:
विधानसभा निवडणुकीची भूमिका आणि कार्यकर्तेची मते जाणून घेण्यासाठी,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक २६सप्टेंबर रोजी निर्धार मेळाव्याचे आयोजन शहरातील रत्नकमल मंगल कार्यालयात करण्यात आले.तालुक्यातील बहुतांश कार्यकर्ते तशेच तालुक्यासह जिल्हा पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित होते.
यावेळी,बोलतांना प्रहारचे प्रवक्ते संतोष पवार यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि नियोजन नमूद केले.येथे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, श्रीगोंदा मतदार संघात दिव्यंग मतदारांची संख्या वीस हजारच्या आसपास आहे. त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात प्रहार संघटना बरोबर राहिली आहे.शिवाय, आमदार बच्चू कडू यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या जीवनात आशेचा किरण निमार्ण झाला आहे.कुकडी लाभ क्षेत्रात प्रहार ने कुकडीचे पाणी आणि ऊसाचे थकीत रक्कमा मिळण्यासाठी व्यापक अदोलन केलेले आहेत.
राज्य पातळीवर समविचारी पक्षांशी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांचे बोलणी चालू आहे.प्रहारची कोणत्याही पक्षाची आघाडी झाली.तरी,आम्ही श्रीगोंद्याची जागा लढविण्यासाठी आग्रही राहू.असे ते यावेळी म्हणाले.श्रीगोंद्याची जागा लढविण्याचा निर्धार करण्यासाठीच प्रहार ने मेळावा घेतला असल्याचे पवार यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी,(जिल्हाध्यक्ष)विनोद परदेशी(कार्याध्यक्ष)अजित धस,(सचिव)प्रकाश बेरड,(उपाध्यक्ष)वामन भदे,साहेबराव रासकर,कुष्णा खामकर,नितीन रोही,महादेव बनसुडे,संतोष गायकवाड,अजित गायकवाड,सुरेश गलांडे,विश्वास सुडगे,ज्ञानदेव भैलूमे,राजेंद्र पोकळे,सह प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित होते.