जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था…
दुतर्फा पसरलेल्या घाणीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात…
पालिकेने खड्डे बुजविण्याची तसदी घ्यावी…

दिनांक २६ सप्टेंबर श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील जिल्हा परिषद शाळा(प्राथमिक मुले व मुली)या शाळांकडे, दिल्ली दरवाजा वेस पासून जाण्याचा रस्ता पावसामुळे अतिशय दलदलीचा झाला आहे.शाळेतील मुलांना शाळेत सोडतांना व घरी नेतांना पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
श्रीगोंदा नगरपालिका मार्फत काही महिन्यांपूर्वी बनविलेल्या (दिल्ली दरवाजा वेस,जिल्हा परिषद शाळा पासून महंमद बाबा पटांगणा) कडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून,या ठिकाणी पावसामुळे साठलेले पाणी,चिखल,दलदल यामुळे परिसरातील नागरिकांसह,शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हररोज कसरत करीत,दुर्गंधीला सामोरे लागत आहे. पालिका प्रशासन वारंवार अशा पद्धतीने रस्त्यांवर निधी खर्च करीत आहे.प्रत्येक वेळी होणारा पाऊस किंवा साठलेलं पाणी पालिकेच्या रस्त्यांची दर्जा आणि गुणवत्ता शहरवासियांना पाहण्यास भाग पाडत आहे.
नमूद रस्त्यावर रोज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान व संध्याकाळी साडे चार ते पाचच्या दरम्यान विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होत असते.यासाठी येथून होणारी रहदारी तसेच स्थानिक रहिवासी यांना या साठलेल्या पाण्याचा आणि दलदलीचा त्रास सहन करावा लागत आहे.पाण्यातून वाट काढत कसेबसे शाळेचे विद्यार्थी आपल्या घरी परततात. त्यातूनच रस्त्याच्या दुतर्फा असलेली घाण,त्यात असलेली डुकर व स्वानं यांनी अतिशय दुर्गंधी पसरलेला परिसर म्हणून नमूद होत आहे. अश्या परिस्थितीत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य थेट धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पालिका प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे.अशी सामान्यांची मागणी आहे.शिवाय या रस्त्यात झालेले खड्डे ,मुरुम किंवा मातीने बुजवून टाकावेत. जेणे करून सामान्यांचे जीवन पूर्ववत करण्याची तसदी पालिका प्रशासनाने घेतल्याचे सर्वांना माहीत होईल.


