श्रीगोंदा शहरातील झेंडा चौकात ४३ हजार ३०० रुपयांची चोरी..

दिनांक २३ ऑक्टोबर ,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील झेंडा चौक परिसरात २२ ऑक्टोबर रोजी रात्री,अजय जीन्स गँलेरी,कटारिया कलेक्शन,गायत्री मोबाईल शॉपी,आनंद मेडिकल या दुकानांतून एकूण ४३ हजार ३०० रुपयांचे साहित्य व रक्कम चोरी गेली आहे.प्रतिक भाऊसाहेब घाटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा शहरातील झेंडा चौक परिसर ही मोठी बाजारपेठ आहे.येथे मोबाईल दुकान,ज्वेलरी,मिठाई,कपड्यांच्या मोठ्या दुकानांसह विविध प्रकारचे दुकानदारी असलेला हा इलाखा आहे.या ठिकाणी दिनांक २२ ऑक्टोबर रोजी रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याचे समोर आले आहे.
सागर देशपांडे या बुरुड गल्ली परिसरातील रहिवाश्याने फोन करून दुकानाचे कडी व शटर तुटले असल्याचे प्रतीक घाटे या दुकान मालकास सांगितल्यावरून संबंधित ठिकाणी चोरी झाल्याचे समोर आले.घटनास्थळी पाहणी केली असता,अजय जीन्स गॅलरीमधून २९ हजार सहाशे रुपयांचे कपडे,कटारिया कलेकशन या आनंद कटारिया यांच्या दुकानातुन ९ हजार ५०० रुपयांचे कपडे,स्वप्नील चव्हाण यांच्या गायत्री मोबाईल मधून ४ हजार रुपये रोख रक्कम व साहेबराव खेतमाळीस यांच्या आनंद मेडिकल शॉपमधून ५ शे रुपये रोख रक्कम असे एकूण ४३ हजार ३ शे रुपये रोख रक्कम व साहित्य चोरी झाल्याचे प्रतीक घाटे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. यावरून परिसरातील सी.सी.टीव्ही.तपासून पोलीस पुढील कारवाई करीत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading