आज रोजी सकाळी २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाली तसे बबनराव पाचपुते हे पहिल्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत आघाडीवर होते.घनश्याम शेलार आणि बबनराव पाचपुते यांच्यात थेट लढत होती.त्या अनुषंगाने बबनराव पाचपुते हे पहिल्या फेरीमध्ये ११७५, दुसऱ्या फेरीमध्ये १८४३, तिसऱ्या फेरीमध्ये २३०६, चौथ्या फेरीत २८६, पाचव्या फेरीत १२५८, सहाव्या फेरीत २६३३, सातव्या फेरीत ३३८८,आठव्या फेरीत १७१४, नव्या फेरीत २०१९, दहाव्या फेरीत २४८४,अकराव्या फेरीत १३१४, बाराव्या फेरीत ८९६ व तेरावे फेरीत ६४ मताने आघाडीवर होते.यानंतर चौदाव्या फेरीपासून शेलार यांनी आपले वर्चस्व काम करीत ९२० मताने आघाडी घेतली.तसेच,पंधराव्या फेरीमध्ये शेलार यांना २१७९, सोळाव्या फेरीत २७५९, सतराव्या फेरीत ३३५७, अठराव्या फेरीत २४२१, १९ व्या फेरीत १७०० व २० व्या फेरीमध्ये ३१ मताने घनशाम प्रतापराव शेलार हे बबनराव पाचपुते यांच्यापेक्षा आघाडीवर राहिले. मात्र पुन्हा २१ व्या फेरीपासून बबनराव पाचपुते यांनी आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवीत २१ व्या फेरीमध्ये ३०४९, २२ व्या फेरीमध्ये ४९२३, २३व्या फेरीमध्ये मध्ये ४६७३, ३४व्या फेरीमध्ये ४४८० व २५ व्या फेरीमध्ये ४५२३ मताने आघाडीवर राहुन या निवडणुकीत विजयी ठरले.
बबनराव भिकाजी पाचपुते यांना पोस्ट द्वारे झालेले मतदान ७५५ असून,घनश्याम प्रतापराव शेलार यांना पोस्ट द्वारे ५२८ मतदान झाले आहे. २२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजय झालेल्या बबनराव पाचपुते यांना एकूण १ लाख २५०३ मतं मिळाली असून,घनश्याम शेलार यांना ९७ हजार ९८० मतं मिळाले आहेत.
याशिवाय बहुजन समाज पार्टीचे उमेदवार सुनील ओहोळ यांना ११४६, आप्पा जठार यांना ३७८, संभाजी ब्रिगेडचे टिळक यांना ११८६, बहुजन मुक्ती पार्टीचे तात्याराम घोडके यांना २८८, वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र सुपेकर यांना ३१६४, अपक्ष उमेदवार प्रमोद काळे यांना २८९, राजेंद्र निळकंठ नागवडे यांना ३२५, सुनील उदमले यांना २६७ हरीचंद्र पाचपुते यांना ८९१ तर नोटा १५७२ इत्यादी मतदान नमूद झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र माळी यांनी २२६ श्रीगोंदा विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करीत,शांततेने निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.