चप्पल चोरीच्या संशयावरून,अल्पवयीन आदिवासी मुलीला पोलिसांनी घेतले ताब्यात..

दिनांक २८ ऑक्टोबर श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या व साधारण चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.हे प्रमाण वाढण्यामागे पोलिसांचे संख्याबळ तसेच दरम्यान झालेल्या विधानसभेची निवडणूकित व्यस्त फौजफाटा कारणीभूत धरल्यास वावगे ठरणार नाही.
काल दिनांक २७ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा शहरातील महाराजा कॉलेज व शिवाजीनगर भागात सोनवणे यांच्या घरी चोरी झाली.याच परिसरात वय वर्ष १४ असलेल्या एका आदिवासी समाजाच्या मुलीला चप्पल चोरीच्या संशयावरून,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब यांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून या चोरीची चौकशी करण्यात आल्याचे समजते आहे.
वास्तविक वय वर्ष १४,शिवाय मुलगी असल्याने कायदेशीर तिला पोलीस ताब्यात घेऊ शकत नाहीत.शिवाय चौकशीसाठी नजरकैदेतही ठेवू शकत नसताना,या आदिवासी समाजाच्या मुलीला श्रीगोंदा पोलिसांनी अशा पद्धतीने वागणूक देत,चप्पल चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.दिवाळीच्या पाडव्याचा सण मागण्या साठी इयत्ता आठवीत शिकत असलेली मुलगी नमूद चोरी झालेल्या परिसरात आढळून आल्याने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पंधरा वर्षाखालील कोणासही चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलता येत नाही.तसेच,कोणत्याही स्त्रीला प्रश्न विचारायचे असतील.तर,ते तिला तिच्या घरी जाऊन विचारले पाहिजेत.असा कायदा असतांना श्रीगोंदा पोलीस स्टेशन या कायदेशीर गोष्टीला वारंवार पायदळी तुडवताना समोर येत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading