महिला पोलिस कर्मचाऱ्याची एस.टी.कामगाराला मारहाण..ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल..
दिनांक २८ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोड वरील लक्ष्मीअंगण या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आबा किरण ससाने व त्यांचे बंधू सोमनाथ किरण ससाने यांना शेजारील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या,अक्षय रोहिदास रडे,अर्चना रोहिदास रडे, ओंकार रोहिदास रडे,रोहिदास रडे यांनी किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाची मारहाण केली आहे. ज्यात,सोमनाथ व आबा ससाणे हे जखमी झाले आहेत. श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये वरील नमूद घटनेवरून रडे कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,मांडवगण रोड श्रीगोंदा येथील लक्ष्मी अंगण या बिल्डिंग मध्ये राहणारे एस.टी. कर्मचारी आबा ससाने व त्यांचे बंधू हे दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता.वरील फ्लॅटमध्ये राहणारे रोहिदास रडे व त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कामानिमित्त बाहेर जाते वेळी,लिफ्टमधून खाली उतरत असतांना लिफ्ट बंद पडली.या लिफ्टची चावी आबा ससाने यांच्याकडे का दिली? याचा राग अनावर होऊन,नमूद रडे कुटुंबियातील इसमांनी आबा व त्यांचे बंधू सोमनाथ यांस लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली आहे.
मुंबई येथे पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या अर्चना रोहिदास रडे सह अक्षय ने सोमनाथ यास बॅटीच्या साह्याने मारहाण केली आहे.आबा ससाने यांच्या डोक्यात तर सोमनाथच्या छातीवर गंभीर स्वरूपाची दुखापत यामुळे झाली आहे.अक्षय रोहिदास रडे,ओंकार रोहिदास रडे,रोहिदास रडे,अर्चना रोहिदास रडे, अलका रोहिदास रडे सर्व राहणार लक्ष्मीनगर , मांडवगण रोड,श्रीगोंदा यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४,१४३,१४७ तसेच,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३(१)(आर)(एस),३(२)(व्ही)(ए) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अर्चना सह एक जणांला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते आहे. याप्रकरणी श्रीगोंदा नगरपालिकेच्या विद्यमान सदस्यांपैकी काहींनी मध्यस्थी केली असून, श्रीगोंदा एस.टी. आगारातील एका अधिकाऱ्याने आबा ससाने यास गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजते आहे.
वाढत्या दलित-आदिवासी अत्याचाराच्या घटना लक्षात घेता.श्रीगोंद्यातील मातंग युवक संघटनेचे कार्यकर्ते या घटनेचा निषेध करणार असल्याचे बोलले जात आहे.