शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्या- संदर्भात,आमदार पाचपुतेंचे जिल्हाधिकार्यांना पत्र…
दिनांक ३० ऑक्टोबर,श्रीगोंदा:
तालुक्यात परतीच्या मान्सूनमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या पिकांचे पंचनामे तातडीने करण्याचे पत्र ,श्रीगोंदा – नगर विधानसभा चे विद्यमान आमदार बबनराव पाचपूते यांनी जिल्ह्याचे कलेक्टर राहुल द्विवेदी यांना आज दिले आहे.
सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने,श्रीगोंदा- नगर विधानसभा मतदारसंघातील ऊस,कांदा,कापूस,द्राक्ष,बाजरी,डाळिंब,लिंबोनी,मका अशा शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत तातडीने पंचनामे करीत शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची कारवाई करण्यात यावी.असे पत्र आमदार बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदा नगर येथील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचेही समजते आहे. लोकप्रतिनिधी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभाग व तहसीलदार यांना हे आदेश केले आहेत.अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने,पंचनामे करण्यासंदर्भात स्थानिक पथके नेमण्याविषयी सूचना जिल्हाधिकाऱ्यां मार्फत करण्यात आल्या आहेत.