माजी विद्यार्थी मेळावा संपन्न..

रयत शिक्षण संस्थेच्या आढळगाव येथील संकुलातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयामध्ये मार्च १९९७ च्या बॅचचा स्नेहबंध माजी विद्यार्थी मेळावा ३० ऑक्टोबर रोजी पार पडला.
दिनांक ३० ऑक्टोबर,श्रीगोंदा:
ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटिल व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागावर झालेली आहे. त्या रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालया विषयी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेम आदराची भावना आहे. विद्यालय विकासामध्ये आपण सक्रिय भूमिका घेतली पाहिजे.असे मत विद्यालयाचे (माजी प्राचार्य)नेटके सर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले.
(माजी शिक्षिका)सौ.हिराबाई गांगर्डे यांनी शाळा हे आईच्या मातृत्वाचे प्रतीक आहे.म्हणून, मुलांनी आईबरोबरच विद्यालयाकडे प्रेमभावनेने आले पाहिजे.शिवाय,एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहिले पाहिजे.त्या माध्यमातून स्नेहबंधनाचे नाते निश्चितच वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही.एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हा.असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी शेळके सर,सय्यद सर, डोके सर,जमदाडे सर,वडवकर सर,गावडे सर,गांगर्डे सर,गव्हाणे सर,सप्रे सर,चांदणे सर,पवार सर जामदार सर(विद्यालयाचे प्राचार्य) घोंगडे सर या सर्वांचा “स्नेहबंध मेळाव्या” च्या सन्मानचिन्ह, शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सामुहिक सत्कार करण्यात आला.
विद्यालयाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करताना माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हरखून गेल्या होत्या, विद्यालयाविषयी सुखदुःखाचे प्रसंग अनेक आठवणी सांगून मन मोकळे केले. शाळेत आल्यानंतर माहेरी आल्याची भावना झाल्याचे मत सुनिता बोळगे, इंदू डोके, रोहिणी वीरकर, विद्या हराळ, या विद्यार्थिनींनी व्यक्त केले. तसेच उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व विद्यार्थ्यांना स्नेहबंध माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन दिनकर पंडित, भरत भोस,राजू राऊत,मनोज ठवाळ,शरद शेळके, अनिल बोळगे ,ॲड.संदीप कावरे,(मेजर)संतोष धोत्रे , (मेजर)गोरक्ष काळे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन झगडे, सूत्रसंचालन सतीश गुगळे व आभार प्रदर्शन प्रशांत गांगर्डे यांनी केले. स्नेह भोजना नंतर कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यालयाचे प्राचार्य घोंगडे सर यांनी केलेल्या विद्यालयाच्या मदतीच्या आवाहनास माजी विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन,विद्यालयास पाच हॅलोजन व विद्यालयाच्या इमारतीवर नावाचा १००फूट × ५ फूट नामफलक देण्याचे कबूल केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading