पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी भगवंतराव वाळके यांची निवड.

दिनांक १८ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
ईपीएस-९५ पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी भगवंतराव वाळके यांची निवड करण्यात आली आहे.
ईपीएस-९५ पेन्शन चळवळीतील वाळके यांचे योगदान अतिशय मोलाचे असल्याने संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत श्रीगोंदा ईपीएस-९५ वेल्फेअर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी वाळके यांची निवड करण्यात आली.याविषयीचे नियुक्ती पत्र संघटनेचे(जिल्हाध्यक्ष)सुभाषराव पोखरकर यांनी वाळकेंना सुपूर्त केले आहे.निवडीसह संघटना बळकटीसाठी भगवंतराव वाळके यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवंतराव वाळके यांचे नियुक्ती पत्र.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading