सा.बां.उपविभाग अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार घालून निषेध.

पेडगाव येथील रस्ता व पुलाची दुरुस्ती न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार :प्रशांत ओगले.

दिनांक १९ नोव्हेंबर,पेडगाव(श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्या वतीने व पेडगाव ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिनांक १८ नोव्हेंबर रोजी पेडगाव व राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल व पेडगाव-श्रीगोंदा रस्ता दुरुस्ती बाबत उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम उपविभाग,श्रीगोंदा) यांना लेखी निवेदन दिण्यात आले होते.
पेडगाव श्रीगोंदा रस्त्याची व पेडगाव राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पुलाची अत्यंत दुरावसस्था झाली आहे.यामुळे नागरिकांना रोजच्या दिनमानात मोठी कसरत करावी लागत आहे.अनेक नागरिकांचे या रस्त्या सह पुलावरून जाताना अपघात झालेले आहेत.
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी संबंधित बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्त करीत पुलाची देखभाल दुरुस्ती करावी.यासाठी केव्हाही आंदोलन करू असे सूचित करण्यात आले होते.दिलेल्या निवेदनाची अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलन करणार हे अधिकाऱ्यानां समजताच,संबंधित कार्यालयातील कर्मचारी व उपविभागीय अधिकारी हे नमूद वेळी अनुपस्थित राहिले.यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व पेडगाव ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून,प्रशांत ओगले (महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)व पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांचा निषेध केला आहे.
संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याशी फोन वर संपर्क साधला असता,त्यांनी त्यांच्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यास संबंधित आंदोलकांना २२ नोव्हेंबर पर्यंत श्रीगोंदा-पेडगाव रस्ता व पेडगाव-राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पूलाची दुरुस्ती करण्यात येईल.असे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले.नमूद पत्राच्या अनुषंगाने कारवाई न झाल्यास दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावून ते बंद करण्यात येईल.असा इशारा प्रशांत ओगले यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनास दिला आहे.
याप्रसंगी कैलास खेडकर डॉ.गोरख बायकर,मल्लूभाई शेख,मुजफ्फर मालजप्तॆ,गणेश पवार,सचिन गायकवाड,विकास काळे,नवनाथ तनपुरे,प्रवीण ढगे, अनिल कणसे,नितीन खेडकर,किरण दरेकर,ताहीर शेख,योगेश शेळके,नितीन कणसे,शफिक हवालदार(पत्रकार),हसन आतार,दादा काटकर,भाऊ गावडे,अजित भोसले,अमोल भोसले,नितीन क्षिरसागर,निलेश उबाळे,तेजस खेडकर,अक्षय आठवले,संदीप वागस्कर,प्रशांत सिदनकर,विशाल पवार,स्वप्निल रेवगे सह बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सा.बां प्रशासनाच्या लेखी पत्रानंतर प्रशांत ओगले यांनी दिलेले आंदोलनाचे निवेदन..img-20191118-wa00938337850034087734603.jpg

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading