श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदी,भीमा नदी सह छोट्या-मोठ्या नद्यां, नाल्यांमध्ये चालू असलेल्या अवैद्य वाळू व गौण खनिज उत्खननावर श्रीगोंदा पोलिस प्रशासनाची करडी नजर असून,तालुक्यात चालू असलेल्या अनधिकृत वाळू व गौण खनिज उत्खननावर दौलतराव जाधव(पोलिस निरीक्षक श्रीगोंदा)यांच्या पथकामार्फत तात्काळ कारवाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,वांगदरी येथील नदी पात्रात चालू असलेल्या,अवैद्य वाळू उत्खननाच्या संदर्भात दोन पंच सोबत घेत,श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईत सुमारे ५५ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत,अज्ञात वाहन चालक व मालकांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यातील वांगदरी गावाच्या जवळ घोड नदी पात्रात चालू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या तीन डंपर व एक ट्रक,पोलिसांच्या पथकात गेलेल्या पोलीस नाईक पितळे,पोलीस कॉन्स्टेबल देवकाते व राऊत यांनी चौकशीसाठी थांबवल्या. पोलीस असल्याच्या संशयावरून ट्रक चालक तिथून पसार झाले.पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.मात्र,ते मिळून आले नाहीत.नमूद कारवाईमध्ये पोलिसांनी तीन डंपर एक ट्रक अशी चार वाळू भरलेली वाहने ताब्यात घेऊन.श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आणून लावली आहेत.यामध्ये ताब्यात घेतलेल्या वाहनांसह त्यात असलेली वाळू,असा एकूण मुद्देमाल ५५ लक्ष ६४ हजार रुपयांचा आहे.नमूद दोन डंपर व एका ट्रकवर श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस असे नाव असून,एका डंपरवर मा.श्री.साजन(भैय्या) पाचपुते मित्र मंडळ,काष्टी असे नाव आहे.
पकडलेल्या वाहनांचे 1.(एम.एच.16 टी.7711),2. (एम.एच.16 बी.सी.7711),3.(एम.एच.12 क्यू.जी.005),4.(एम.एच.16 सी.ए.7711) क्रमांक असून.या प्रत्येक वाहनांमध्ये चार ब्रासचा आसपास वाळू भरण्यात आली होती.नमूद वाहनांच्या चालक व मालकां विरोधात भा.दं.वि.कलम ३७९ सह पर्यावरण संरक्षण कायदा कलम ३/१५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागवडेंच्या वांगदरीत,पाचपुते यांच्या नावाच्या ट्रक बेकायदेशीर वाळू वाहत असल्याने,पाचपुते-नागवडे यांची मैत्री अधिक घट्ट झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे? अशी चर्चा या नमुद कारवाईच्या अनुषंगाने ऐकण्यास मिळाली.