३६ तासांत गुन्हा उघडकीस करीत,आरोपी केले जेरबंद..श्रीगोंदा पोलिसांची कारवाई..
दिनांक २५ नोव्हेंबर(लिंपणगाव)श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील ठोमस्कर वस्तीवर झालेली घरफोडी,श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या ३६ तासांच्या आत उघडकीस आणीत,मुद्देमाल हस्तगत करीत,आरोपी जेरबंद केले आहेत.
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास,लिंपणगाव शिवारातील ठोमस्कर वस्ती येथील रहिवाशी गणेश अर्जुन सावंत त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या(पत्र्याचे शेड) घरांमध्ये झोपले असता, दरवाजा उघडा दिसला.शिवाय,कपड्याची व सामानाची उचकापाचक झालेली दिसली.अस्तव्यस्त पडलेले सामान पाहता, घरात चोरी झाली असल्याची त्यांची खात्री पटली.यावेळी पाहणी केली असता,पाच हजार रुपये रोख,दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन मोबाईल असा ऐवज चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सावंत यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पो.स्टे.ला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यानुसार,श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नमूद गुन्ह्याच्या तपासकामी पथक रवाना केले.सदर पोलीस पथकाने तपासाची सूत्रे हलवीत, हा गुन्हा मोहरवाडी,कोळगाव,तालुका श्रीगोंदा येथील सराईत गुन्हेगारांनी केल्याचे खात्रीलायक माहिती मिळवली.त्यानुसार,आरोपीचे ठिकाणावर पहाटेच्या सुमारास छापा टाकला.यावेळी आरोपींनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन,त्यांना पकडले.
रमेश मोत्या काळे(राहणार मोहरवाडी तालुका श्रीगोंदा),दिनेश रमेश काळे(राहणार मोहरवाडी, कोळगाव,तालुका श्रीगोंदा),संदेश संजय भोसले (राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा)असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत.त्यांच्याकडे चौकशी केली असता,त्यांनी नमूद गुन्ह्याची कबुली दिली आहे. चोरलेला मोबाईल व सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरले ले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहे.
सदर गुन्ह्यातील म्होरक्या रमेश मोत्या काळे(राहणार मोहरवाडी तालुका श्रीगोंदा)हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर पुणे जिल्ह्यात तसेच श्रीगोंदा, बेलवंडी,अहमदनगर पोलीस स्टेशनला पूर्वी गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई(पोलीस अधीक्षक,)श्री.इशू सिंधु, (अप्पर पोलीस अधीक्षक)सागर पाटील,(उपविभागीय पोलिस अधिकारी)संजय सातव,कर्जत विभाग कर्जत,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शना खाली स.पो.नि.सतीश गावित पो.हे.कॉ.अंकुश ढवळे, पो.कॉ.किरण बोराडे,दादासाहेब टाके,संतोष कोपनर, उत्तम राऊत,प्रताप देवकाते(सायबर सेलचे)प्रशांत राठोड,म.पो.कॉ.लता पुराने यांनी केली आहे.पुढील तपास स.पो.नि.सतीश गावित हे करत आहेत.