श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील मधुकर डहाळे यांच्या सोन्याच्या दुकानांत तसेच,विमल कांबळे व मूस्सा शेख या इसमांच्या घरी चोरी झाली असून,सुमारे २ लाख १८ हजार रुपये किमतीचा ऐवज व रक्कम चोरांनी चोरी करून नेला आहे. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी पहाटे घोगरगाव परिसरात ही चोरीची घटना घडली आहे.
मधुकर प्रभाकर डहाळे यांच्या डहाळे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानांत,दिनांक २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ च्या सुमारास,तय्यब पठाण यांच्या मुलाने भाऊ गजानन डहाळे यांना फोन करन डहाळे ज्वेलर्सचे शटर उघडे असल्याचे सांगितले.यावेळी प्रत्यक्ष दुकानात जाऊन परिस्थिती पाहिली असता,दुकानात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.याच बरोबर विमल कांबळे व मुस्सा शेख यांच्या घरातही चोरी झाल्याचे निदर्शना स आले.
१ लाख ५० हजार रुपये किमतीची साडेतीन किलो वजनाची चांदी,ज्यात मोड,बिचवे,अंगठी,कडे,मासुळे, ब्रासलेट,फुले वगैरे चांदीचे दागिने डहाळे ज्वेलस या दुकानातून चोरी गेले.त्याचबरोबर मुस्सा शेख यांचे घरातून २० हजार रुपये रोख रक्कम व दोन ग्रॅम सोन्याचे बदाम तशेच चांदीच्या पट्ट्या अज्ञात चोरांनी चोरल्या.४८ हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचा सोन्याचा गंठण व एक सोन्याची माळ आणि ८ हजार रुपये रोख रक्कम असे विमल बाळासाहेब कांबळे यांच्या घरातून चोरीस गेले आहेत.
नमूद डहाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात भा.दं.वि.कलम ४५७ व ३८० नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.