महिलेच्या अंगावरील दागिने चोरणारे दोघे,श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात…

दिनांक २७ नोव्हेंबर,अजनुज(श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यात अजनुज येथील महिलेच्या अंगावरील दागिने लुटणारे दोन आरोपी जेरबंद करीत, आरोपींकडून चांदीचे पैंजण,सोन्याची कर्णफुले,असा १६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत… श्रीगोंदा पोलिसांची कारवाई…
तालुक्यातील अजनुज येथील रहिवाशी सौ.अंजना हनुमंत गिरमकर या आपल्या शेतातील काम आटोपून घरी जात असतांना, अजनुज ते निमगाव खालू रस्त्याच्या निर्जन स्थळी,दोन अनोळखी २० ते २५ वयोगटातील तरुणांनी मोटार सायकलवरून येत,या महिलेच्या अंगावरील दागिने झटापटी करून ओरबाडून चोरून नेले होते.यात महिलेला दुखापत झाली होती. २ ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेनंतर पिडीत महिलेचा फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी अज्ञात इसमां विरोधात भा.दं.वि. कलम ३९४ नुसार गुन्हा नोंदविला होता.
या नंतर नमूद प्रकरणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तपास कामी पथक नेमून शोध घेत होते. मात्र,त्यांना यात काही सुगाव मिळत नव्हता. दिनांक २४ नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दागिने चोरणारे इसम लिंपणगाव येथील पारधी वस्तीवर असल्याचे समजले.त्यानुसार,पोलीस पथक नेमून पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित ठिकाणी छापा टाकला.तेथे बाब्या विलास भोसले वय वर्षे २२ व आदेश पोपट काळे,वय वर्षे २० असे इसम मिळून आले.अजनुज येथील दरोड्याच्या संदर्भात त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी अजनुज येथील महिलेस मारहाण करून,तिच्या अंगावरील दागिने ओरबाडून चोरून नेल्याचे कबूल केले.
दिनांक २४ नोव्हेंबर रोजी नमूद आरोपींना मा.न्यायालयात हजर करण्यात आले.सदर आरोपींना न्यायलयाने २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली.दरम्यान आरोपींकडे केलेल्या चौकशीत लिपंणगाव शिवारात महिलेचे दागिने लपून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर नमूद ठिकाणावरून पोलिसांनी मोठ्या वेड्या बाभळीच्या झाडाखाली काटवनात,दगडाखाली ठेवलेले दागिने हस्तगत केले आहेत.
मा.(पोलीस अधीक्षक)श्री.इशू सिंधू सो.,(अप्पर पोलीस अधीक्षक)सागर पाटील,(उप विभागीय पोलीस अधिकारी)संजय सताव,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव,यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.राजेंद्र सानप,प्रसपोनि माळी,पोहेकॉ.अंकुश ढवळे,पो.कॉ,किरण बोराडे,दादासाहेब टाके,संतोष कोपनर,उत्तम राउत,रवी जाधव,प्रताप देवकाते, म.पो.कॉ.लता पुराने,यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.गुन्ह्याचा पूूढील तपास(स.पो.नि.) राजेंद्र सानप करीत आहेत.

 

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading