दारू बंदीसाठी महिलांचा पुढाकार,कारवाई न झाल्यास आंदोलन करणार..

img-20191128-wa00831782039669296386034.jpg
पारगाव सुद्रिक येथील महिलांचे दारू विक्री बंद करण्याविषयीचे निवेदन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना सादर करतांना(छायाचित्र:अमर घोडके)
दिनांक २९ नोव्हेंबर(पारगाव सुद्रिक)श्रीगोंदा:
तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे अनधिकृत दारू विक्री चालू असून,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कार्यक्षेत्रात अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत चालले आहे.दारू पिऊन गावामध्ये दहशत निर्माण करणार्‍यांचे प्रमाण अधिक आहे. यापासून साधारण माणसांना आपला जीव मुठीत धरून,जीवन व्यतीत करावे लागत आहे.यावर पर्याय म्हणून,पारगाव सुद्रिक येथील महिलांनी पुढाकार घेत,गावातील दारू बंदी साठी श्रीगोंदा पोलीस स्टेशन सह पारगाव सुद्रीक ग्रामपंचायला दारूबंदी करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
दिलेल्या निवेदना प्रमाणे दिनांक २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभे मध्ये,”आपले गावात संपूर्ण दारू विक्री बंद करणेबाबत” अश्या विषयाच्या अनुषंगाने सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला आहे.यानुसार श्रीगोंदा पोलीस निरीक्षकां सह सरपंच पारगाव सुद्रिक यांना या विषयीचे पत्र देण्यात आले आहे.ज्यात गावात पूर्ण दारू विक्री बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.दारुडे गावात दारू पिऊन नंगा नाच करीत आहेत.दारू पिऊन त्यांचे संसार सुद्धा उध्वस्त झाले आहेत.काही युवक दारू पिऊन मरण पावले आहेत.अतिशय गंभीर अवस्था दारुमुळे पारगाव गावात झालेली असून,गावात कुणालाही दारू विक्री करण्याचे कायदेशीर परवाने नाहीत.तरीही,दारू विक्री सर्रासपणे चालू आहे.याला जबाबदार कोण? असा सवाल निवेदनात करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासनाने त्वरित दारू विक्री बंद करावी. असे पत्र देण्यात आले आहे.कारवाई न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही स्पष्ट होत आहे.यानंतर,प्रशासनाने स्थानिक दारू विक्री करणारांना बोलावीत,तात्काळ हे धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading