बॅटरी चोर पोलिसांच्या ताब्यात…

img-20191202-wa0064575125327407122785.jpg
ॲमेरॉन कंपनीच्या बॅटरी,ज्याची बाजार किंमत चोवीस हजार आहे.या चोरी प्रकरणातील आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी छत्तीस तासांमध्ये जेरबंद केले आहे.
दिनांक ३ डिसेंबर(श्रीगोंदा कारखाना,श्रीगोंदा):
श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे दिनांक २९ नोव्हेंबर रोजी,फिर्यादी विजय लक्ष्मण खराडे(राहणार श्रीगोंदा कारखाना तालुका श्रीगोंदा यांनी दिलेल्या फिर्यादीचा अनुषंगाने,श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीदाराच्या माहितीनुसार, तपासाची सूत्रे हलवून,श्रीगोंदा फॅक्टरी येथील समीर इक्बाल शेख हा इसम चोरीस गेलेल्या बॅटरीचे फोटो मोबाईल मध्ये लोकांना दाखवून गिऱ्हाईक पाहत आहे.या पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार श्रीगोंदा फॅक्टरी येथून समीर शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडे यासंदर्भात अधिक चौकशी केली असता,त्याचा मित्र प्रेमराज गुलदगड(राहणार श्रीगोंदा कारखाना,तालुका श्रीगोंदा)याने मोबाईल मधील बॅटरीचे फोटो समीर शेख यांचे मोबाईलवर पाठवले व या बॅटऱ्या विकण्यासाठी गिराईक पाहण्यास सांगितले होते. या सर्व चौकशी वरून प्रेमराज गुलदगड व अनिल शंकर साबळे दोन्ही राहणार श्रीगोंदा कारखाना यांनाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई श्री.इशू सिंधू सो।(पोलीस अधीक्षक अहमदनगर),श्री.सागर पाटील सो।(अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर),श्री.संजय सातव सो।(उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत,भाग कर्जत) यांचे मार्गदर्शनाखाली श्री.दौलतराव जाधव(पोलिस निरीक्षक,श्रीगोंदा पो.स्टे.) पो.हे.कॉ.विठ्ठल बडे,पो. कॉ. रमाकांत परीट,भारत गायकवाड,प्रताप देवकाते दादासाहेब टाके,अमोल शिंदे,अविनाश ढेरे यांनी केली आहे.पुढील तपास दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.विठ्ठल बडे व पो.कॉ.रमाकांत परीट करीत आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर,कमीत कमी वेळेत आरोपी ताब्यात घेण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांचा आता जिल्ह्यात काय ? पण आसपासच्या कार्यक्षेत्रात ही मोठा दबदबा निर्माण झाला आहे.तालुक्यात होत असलेल्या घरफोड्या,दरोडे,जबरी चोऱ्या अश्या प्रकरणातील गुन्हे दाखल होत न होत तोच,श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या मार्फत संशोधनाची चक्रे गतिमान करीत,वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांना ताब्यात घेण्यात,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अतिशय तत्पर असल्याचे नमूद प्रकरणांतून निदर्शनास येत आहे.
श्रीगोंदा शहरासह आसपासच्या परिसरात नगरपालिकेचे मार्फत बसविण्यात आलेल्या,सुमारे हजाराच्या आसपास सौर दिव्यांच्या बॅटरीही,नमूद कार्यक्षेत्रातून चोरीस गेल्याचे समजते आहे.या बॅटऱ्या शहरातील मोठ्या भंगार गोळा करणाऱ्या व्यवसायिकांनी खरेदी करीत,विकल्या असल्याचेही ऐकण्यात येत आहे.यावरही कारवाई व्हायला हवी.अशी मागणी सामान्यांच्या चर्चेतून पुढे येत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading