वाळू तस्करांवर कारवाई,४५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
दिनांक १५ डिसेंबर(वांगदरी,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी परिसरात घोड नदी पात्रात चालू असलेल्या,अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत श्रीगोंदा पोलीसांनी ४५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी केलेल्या सूचनेनुसार,सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित ,पो. कॉ.कोपनर,देवकाते,ढेरे व सोबत दोन पंच घेत, सदरील कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
नमुद ठिकाणी जात असतांना,वांगदरी गावच्या मदने वाडी परिसरातील घोड नदीच्या पात्रा शेजारी तीन ट्रक व डंपर हे वाळू वाहतूक करत असताना पोलिसां च्या निदर्शनास आले.दिनांक १२ डिसेंबर रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तीन ट्रक व डंपर वरील सुनील भारत काकडे,राहणार दैठणे,तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद.एम.एच.१२/८९०९ वरील ट्रक चालक मालक प्रवीण दगडू शेडे राहणार शिरूर, तालुका शिरूर,जिल्हा पुणे एम.एच.१२ एच.सी. ७५८७ वरील ट्रक चालक गणेश रावसाहेब सांगळे तरडोबाची वाडी,तालुका शिरूर.एम.एच.१२ डब्ल्यू. ९९९५ डंपर वरील चालक-मालक, ट्रक नंबर एम.एच.१२ एल.टी.वरील अज्ञात चालक-मालक यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक व डंपरच्या साह्याने संगणमत करून,विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने वांगदरी गावच्या मदनवाडी शिवारात,घोड नदीपात्रातील शासकीय गौण खनिज चोरून वाहतूक करतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास करतांना नमूद इसम मिळून आले.या पोलीस शिपाई अमोल श्रीरंग आजबे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अज्ञात चालक,मालक यांच्या विरोधात भादवि कलम ३७९,३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.