स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून,दरोडा टाकणाऱ्या तिघांना पोलिसांनी केले जेरबंद..
दिनांक १६ डिसेंबर(बेलवंडी,श्रीगोंदा):
फिर्यादी संजय कुमार दुखीराय राहणार बंगला क्रमांक ४,महाडा कॉलनी,लोखंडवाला कॉम्प्लेक्स,अंधेरी वेस्ट, मुंबई यांना व त्यांच्या दोन मित्रांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून,कृष्णा नावाचा इसम व त्याच्या पाच साथीदारांनी दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास रेल्वे ब्रिजच्या पूर्वेस विसापूर,उखलगाव रोड,विसापूर,तालुका श्रीगोंदा येथे बोलावून ,त्यांच्याकडील रोख रक्कम व तीन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ९९ हजाराचा ऐवज जबरीने चोरून नेला.
सदरची माहिती बेलवंडी पो.स्टे.ला मिळतात,पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली तात्काळ गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे कामी पोलीस सब इन्स्पेक्टर बोराडे व पथकास आवश्यक त्या सूचना देऊन,रवाना केले.पो.स.इ. बोराडे यांनी गुप्त बातमीदाराच्या मदतीने गुन्हा घडल्यापासून अवघ्या सहा तासांत गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन आरोपींना श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथून पकडले आहे. शिवाय नमूद आरोपींना फिर्यादीने ओळखले असल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले आहे.
सदर प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यामध्ये आरोपी नामे घड्याळ्या हिरामन चव्हाण वय वर्षे ५२ राहणार सुरेगाव,तालुका श्रीगोंदा,इकबाल उत्तम काळे वय वर्षे ५१ राहणार सुरेगाव,तालुका श्रीगोंदा,रफिक कुंजा चव्हाण वय वर्ष ३० राहणार जोशीवस्ती ढोकराई,तालुका श्रीगोंदा यांना अटक करण्यात आले असून,पुढील तपास पो.स.इ.बोराडे करीत आहेत.
सदरची कारवाई सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक(अहमदनगर कार्यभार -पोलीस अधीक्षक अहमदनगर),संजय सातव (पोलीस उपअधीक्षक कर्जत विभाग)यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे(पोलीस निरीक्षक)अरविंद माने, (पोलीस उपनिरीक्षक)प्रकाश बोराडे,(सहाय्यक फौजदार)बजरंग गवळी,(पोहेकॉ)प्रकाश बारवकर,रवींद्र देशमुख(पो.ना)नंदकुमार पठारे,रावसाहेब शिंदे,दादासाहेब क्षिरसागर यांनी केली आहे.