शमुवेल गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदी नियुक्ती…

दिनांक १७ डिसेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले,शमुवेल सदानंद गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गायकवाड हे श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जिल्हा विशेष शाखा(अधिक्षक कार्यालय, अहमदनगर)मार्फत कर्तव्यावर आहेत.श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गायकवाड यांना अधीक्षक कार्यालय अहमदनगर कडून कार्यरत करण्यात आलेले आहे.तालुक्यातील गंभीर व दखलपात्र गुन्ह्याचा पाठपुरावा करने,गुन्हेगारी वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे व गोपनीय गुन्ह्यातील हालचाली वर लक्ष ठेवीत वरिष्ठांच्या सूचनांनुसार कायदा आणि सुव्यवस्था आबादीत ठेवण्यात गायकवाड दादांचा विशेष हातखंडा आहे.
त्यांच्या या पदोन्नती बद्दल पोलीस सहकारी,अधिकारी सह पत्रकार व मित्रांकडून अभिनंदन करीत पुढील वाटचालीस त्यांना सदिच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading