आढळगाव जिल्हा परिषदच्या वतीने”बाल आनंद मेळावा”संपन्न..

दिनांक १७ डिसेंबर,श्रीगोंदा:
जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत,श्रीगोंदा तालुक्यातील(जिल्हा परिषद गट) आढळगाव या गटाचा बाल आनंद मेळावा मंगळवार दि १७ डिसेंबर रोजी श्रीगोंद्यातील तुळशिदास मंगल कार्यालय,पेडगांव रोड येथे सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडला.आढळगाव गटाच्या जि.प.सदस्या सौ.पंचशिलाताई रमेश गिरमकरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या बाल आनंद मेळाव्यास आढळगाव,पेडगाव, श्रीगोंदा,नारायण आश्रम,देवळगाव,पारगाव सु. लिंपणगाव,काष्टी,या केंद्रातील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी तसेच आढळगाव गटाच्या सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.श्रीगोंदा तालुक्यातुन ७ केंद्र,७२ शाळा,२००० विद्यार्थी,२४८ शिक्षक सह प्रमुख उपस्थितित शुभांगी मनोहर पोटे,शाहाजी हिरवे,शहाजी खेतमाळीस,प्रतिभा झिटे,प्रशांत काळे,अनिल शिंदे, दिलीप घोडके,हाकीम साहेब,नितीन खामकर, भगवान कणसे,देविदास शिर्के,प्रकाश घोडके,बापू करांडे मान्यवर होते. प्रास्ताविक सुरेश ढवळे यांनी केले व सर्वांचे आभार मानले.

(वार्तांकन व छायाचित्रे:शफिक हवलदार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading