शेतकरी संघटनेचे २२ डिसेंबरचे रस्ता रोको आंदोलन स्थगित..

दिनांक १७ डिसेंबर,श्रीगोंदा:
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,नुकसान भरपाई व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने पुकारलेले २२ डिसेंबरचे रस्ता-रोको आंदोलन तुर्ततः स्थगित करण्यात येत असल्याची,माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,कोरड्या व आोल्या दुष्काळात पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचा योग्य मोबदला शेतकर्यांना मिळावा, व्यापार स्वातंत्र्य व तंत्रज्ञान,स्वातंत्र्य या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने दोन टप्यात निर्बंधमुक्ती आंदोलन जाहीर केले होते.१२ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ३०० ठिकाणी शांततेत आंदोलन करुन,शासनाला इशारा देण्यात आला होता.परंतू,अद्याप सरकारच व्यवस्थीत स्थापन झालेले नाही.नविन सरकारचा कारभार सुरळीत होण्यास,काही अवधी द्यावा.या हेतूने हे आंदोलन काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
सत्तेत आलेल्या पक्षांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्ती देऊन,सातबारा कोरा करण्याचे अश्वासन दिले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत विचार करुन योग्य निर्णय घ्यावा,ही अपेक्षा आहे.त्यासाठी सरकारला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन,शेतकरी संघटनेने आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय जाहीर करुन,तातडीने त्याची अंमलबजावणी करावी.अन्यथा शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल!असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading