कॅब आणि एनआरसी दुरुस्ती विधेयक २०१९ च्या निषेधार्थ जमिअत उलेमा -ए -हिंद चे श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन सादर..
निवेदन सादर करतांना जमिअत उलेमा ए हिंद संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव (छायचित्र :अमर घोडके)
दिनांक १८ डिसेंबर,श्रीगोंदा:
एनआरसी/कॅब आणि त्यासंदर्भातील दुरुस्ती कायदे हे भारतीय संविधानाला अनुसरून नसून,सामान्य मुस्लिम समाजाला छळणारे व त्यांच्यावर अमानवीय अत्याचार करणारे असल्याचे मत,यावेळी उपस्थित जमीर शेख(सर)यांनी निवेदन सादर करण्यापूर्वी जमलेल्या समाजबांधवांना तसेच या विषया समर्थनात निवेदन देण्यासाठी आलेल्या विविध राजकीय तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांसमोर व्यक्त केले आहे.
पुढे बोलतांना शेख म्हणाले की,भाजपा सरकार कडून संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.हे घटनाबाह्य असल्याने,त्याच्या निषेधार्थ आपण सर्व येथे जमलो आहोत.तसेच या विषयाचे निवेदन तहसीलदार श्रीगोंदा यांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.आज दिनांक १८ डिसेंबर रोजी,सकाळी १०:३० वाजता श्रीगोंद्याचे नायब तहसीलदार यांना नमूद निषेधाचे निवेदन देण्यात आले.
नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझनशिप आणि सिटीझनशिप अमेंडमेंट बिला तील जाचक व संविधान विरोधी तरतुदींच्या निषेधार्थ नमूद निवेदन देण्यात आले.मुस्लिम संघटनेच्या समवेत काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाला पाठिंबा दर्शवत निषेध नोंदवला आहे. यावेळी अजिम भाई जकाते,अरविंद कापसे,टिळक भोस,हरिदास शिर्के,मनोहर पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सर्व समाज बांधवांच्या वतीने लियाकत भाई तांबोळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदरील निवेदन देतेवेळी जमीर शेख(सर),मौलाना मोहिनुद्दीन अत्तार(तालुकाध्यक्ष),अमीन भाई शेख (संपादक),प्रशांत गोरे,अब्दुल रहिम जकाते, अख्तरभाई शेख(मा.नगरसेवक),फैय्याज भाई शेख,वशीम ताडे,मन्सूर शेख,(डॉक्टर) राजू सय्यद,अशपाक सय्यद,(डॉक्टर)रिजवान जमादार,(डॉक्टर)मजहर सय्यद,निसार अहमद,शेख युसुफ पटेल (पत्रकार) , वजीर भाई जकाते,लियाकत भाई तांबोळी,अजीम जकाते,समीर काझी,अजित शेख,जमिर जकाते, इरफान खान,सादिक जमादार, निसार भाई हकीम, इरफान शेख,मुजाहिद्दीन शेख, आशिर जकाते, आसिफ इनामदार,सलीम भाई जकाते, फिरोज भाई पठाण,समीर बेपारी,निसार भाई कुरेशी (नगरसेवक) शब्बीर नाना कुरेशी सह जमिअत उलेमा -ए -हिंद चे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.