राजेशिर्के घराण्याचा इतिहास चुकीच्या पद्धतीने प्रसारीत करणाऱ्यांवर,गुन्हे दाखल करण्याचा निर्णय..

दिनांक १९ डिसेंबर, पेडगाव,श्रीगोंदा:
सध्या युट्यूब चॅनेल,फेसबुक ग्रुप पेज,वॉट्सअप ग्रुप एडमिन,सोशियल मिडिया चालकांसह स्वयंघोषित बुद्धिभ्रष्ट लेखकांकडून राजेशिर्के घराण्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने इतिहासाचा प्रचार-प्रसार होत असल्याचे निदर्शनास आल्याने,संबंधितांंवर कायदेशीर कारवाई करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शंभुसेना संघटना प्रमुख दिपक राजे शिर्के यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
शिव-शंभुकाळातील छत्रपती शंभुराजांच्या वास्तव इतिहासाची सोनेरी पाने जगासमोर उलगडत असताना,शिव-शंभुराजांवरील चुकीच्या इतिहासाचे आक्षेप खंडन झाले असून,छत्रपतींचे जवळच्या अनेक नातेवाईकांसह,राजेशिर्के घराण्यावरीलही असणाऱ्या खोट्या कलंकित इतिहासाचे आक्षेप खंडन झाले असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख खात्याने निर्दोष पत्र जाहिर केले असतांना देखील अनेक बुद्धिभ्रष्ट स्वयंघोषित लेखक मंडळी चुकीचा इतिहास पसरवत असल्याने अनेक राजघराण्यांचे वंशज मंडळी जागृत झाली आहेत.
त्यानुसार शंभुसेना संघटना, समस्त राजेशिर्के वंशज घराणे,राजेभोसले घराण्यांसह ऐतिहासिक नातेवाईक घराण्यांने एकत्र येत कायद्याच्या आभ्यासु सल्लागारांमार्फ़त कायदेशीर मार्गदर्शनानुसार चुकीचा इतिहास प्रसार करणाऱ्या संबंधित नेटकऱ्यांंना वकिलांमार्फत नोटीसा पाठवत गुन्हा दाखल करण्याबाबत निश्चित करण्यात आले आहे.
त्यामुळे, लवकरच इतिहासाची मोड़तोड़ करणाऱ्यां सह इतिहासा संदर्भात सामाजीक माध्यमातून चुकीच्या पोस्ट शेयर करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार असल्याचे बोलले जात आहे.तसेच राजेशिर्के यांनी ऐतिहासिक पुरावे व पुराभिलेख खात्याचे पत्रही पुरावा म्हणून जाहिर केलेले आहे.म्हणून,तोतया लेखकांना बोगस पोस्ट डिलीट करण्याशिवाय पर्याय नसल्याने,स्वयंघोषित बुद्धिभ्रष्ट लेखकांमधे एकच खळबळ उडाली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.







****************************************
