राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांच्या स्पर्धा गाजविणाऱ्या,नगर जिल्ह्यातील १५ शाळकरी व महाविद्यालयीन क्रीडापटूंचा अग्नीपंख फौंडेशनने सन्मान केला असून,भविष्यात खेळातून चौफेर यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.
श्रीगोंदा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात (माजी आमदर)राहुल जगताप,(सभापती)शहाजी हिरवे,(नगराध्यक्षा)शुभांगी पोटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे हे होते.
राहुल जगतापम्हणाले की,भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा विचार घेऊन विद्यार्थी व शाळांसाठी अग्नीपंख फौंडेशन चांगले काम करीत आहे.ज्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला , त्यामधील भविष्यात भारताचा तिरंगा झेंडा हातात घेऊन मैदानात उतरतील असा विश्वास आहे.
राजेंद्र नागवडेम्हणाले की,सध्या धावपळीच्या जीवनात फिटनेस साठी खेळ महत्त्वाचा आहे.त्यांची सुरवात बालवयात झाली,तर निश्चितच दुहेरी फायदा होईल.
यावेळी,प्रा.तुकाराम दरेकर,सतिशशेठ पोखर्णा,डॉ. एकनाथराव खांदवे,सुवर्णा पाचपुते,भाऊसाहेब गोरे, गोरख उंडे,दिलीप काटे यांची भाषणे झाली.प्रास्तविक एन.टी.शेलार यांनी केले.सुनील माने,विलास काकडे,सचीन कदम, दत्तात्रय कोठारे,मिथुन नगरे,हनुमंत फंड,अंजली बगाडे,शुभांगी लगड,चेतना मागडे आदि याप्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले.
## दिव्यांगी आणि टाळ्या ##
नगर येथील बाल धावपटू दिव्यांगी लांडे हीच्या गाडीला राष्ट्रीय स्पर्धेच्या अगोदर मोठा अपघात झाला होता. या अपघातून ती व तिचे आई वडील बचावले. अशा परिस्थितीत दिव्यांगी ने १००,२०० मीटर धावणे मध्ये कांस्यपदक पटकविले.अशा दिव्यांगीचा सत्कार होत.असताना टाळ्यांचा कडकडाट झाला.