आरोपी जेरबंद करीत,गुन्ह्यातील रक्कम जप्त.

दिनांक २० डिसेंबर मांडवगण श्रीगोंदा
तालुक्यातील मांडवगण येथे राहणारे दशरथ मुलतान शिंदे हे १७ डिसेंबर रोजी दुपारी १;०० वाजता आपल्या शेतातील पत्र्याच्या खोलीमध्ये कपडे लटकवून शेतात कामाला गेले.काही वेळाने पाणी पिण्यासाठी खोलीत आले असता,त्यांना त्यांचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले.त्यांनी कपडे तपासले असता,खिशात ठेवलेले चार हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर,श्रीगोंदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,सदर गुन्हा पप्पू उर्फ प्रवीण लाला भोसले(वय वर्ष २३) राहणार बाभूळगाव,तालुका कर्जत याने केलेबाबत खात्रीपूर्वक माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या सूचनेनुसार सदर आरोपीचा शोध घेणे कामी(सपोनी)राजेंद्र सानप,(सहाय्यक फौजदार)अनिलराव भारती (पोहेकॉ)अंकुश ढवळे,किरण बोराडे,दादासाहेब टाके,(मपोकॉ)लता पुराने यांच्या पथकाने आरोपीच्या राहते घरातून त्याला ताब्यात घेऊन,पोलीस स्टेशनला आणले व खात्री करून त्यास अटक केली. पोलिस कस्टडी घेऊन त्याच्या गुन्ह्याचा तपास केला. त्यानुसार त्याने चोरी केल्याची कबुली देत,चोरलेल्या रक्कमेपैकी तीन हजार रुपये रक्कम काढून दिली . पोलिसांनी गुन्ह्याचे तपासकामी नमूद रक्कम जप्त केली.तशेच,आज दिनांक १९ डिसेंबर रोजी फिर्यादी शिंदे यांना मा.न्यायालयाच्या आदेशानुसार तीन हजार रुपये त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
सदरची कारवाई (अप्पर पोलीस अधीक्षक)सागर पाटील अहमदनगर,(उपविभागीय पोलिस अधिकारी) संजय सातव,कर्जत विभाग कर्जत,(पोलिस निरीक्षक)दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली (सपोनि)राजेंद्र सानप,(सहाय्यक फौजदार)अनिल राव भारती,(पोहेकॉ)अंकुश ढवळे,दादासाहेब टाके, (मपोकॉ)लता पुराणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading