राष्ट्रीय भटके-विमुक्त मोर्चाच्या वतीने समाजाच्या लाभार्थ्यांना रेशन कार्डचे वाटप..
दिनांक २० डिसेंबर,श्रीगोंदा:
दिनांक १९ डिसेंबर रोजी श्रीगोंद्यात राष्ट्रीय भटके-विमुक्त मोर्चाच्या वतीने,नंदीवाले,(नाथपंथी)डवरी गोसावी समाजाच्या लाभार्थ्यांना रेशन कार्ड देण्यात आले.रेशनकार्डचे वाटप करतांना श्रीगोंद्याचे तहसीलदार मा.महिंद्र माळी(महाजन),नायब तहसी लदार योगिता ढोले मॅडम,पुरवठा शाखेतील दत्तात्रय साळुंखे,तालुका पुरवठा अधिकारी सुनील पाचारणे, लालासाहेब चोपडे,नितीन शेळके,बाळू शिंदे,सह पवार यावेळी उपस्थित होते.
भटके-विमुक्त व एसी,एसटी,ओबीसी प्रवर्गातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी श्रीगोंदा महसूल विभागाची यंत्रणा सतत सजग आणि तत्पर असल्याने,संजय सावंत यांनी त्यांचे विशेषतः तहसीलदार माळी यांचे यावेळी आभार मानले आहेत.
रेशन कार्ड वाटप करतांना,राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा महाराष्ट्र राज्य संयोजक संजय सावंत,तालुकाध्यक्ष दादा शिंदे,भाऊसाहेब फुलमाळी,नवनाथ शिंदे उपस्थित होते. लाभधारकांमध्ये फुलमाळी,काकडे मले,सावंत,शिंदे,फुलारी नावांचे लाभधारक उपस्थित होते.