बुरसटलेल्या विचारांची “साफसफाई” करणारे, संत शिरोमणी गाडगे बाबा:प्रा.सुरेश गायकवाड सर..

दिनांक २०डिसेंबर,श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रा. गायकवाड बोलत होते.ते भाषणात म्हणाले की,आपल्या रसाळवाणीने ज्यांनी उभा महाराष्ट्र शहाणा करून सोडला.ते महान संत म्हणजे गाडगे बाबा.”देव दगडात नसून माणसात आहे”आणि दीन दलितांसाठी आयुष्य वेचणाऱ्या फुले-शाहू- आंबेडकर-कर्मवीर भाऊराव पाटील यांना देव माना. त्यांच्यातील माणूसकीची पूजा करा.हे जगाला ठणकाणून सांगणारे संत म्हणजे श्री संत गाडगे बाबा होते.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वणाचा आघात सहन न झाल्याने संत गाडगे महाराजांचे अवघ्या पंधरा दिवसातच देहावसान झाले.गाडगे महाराजांचा आदर्श समाजासाठी दीपस्तंभा प्रमाणे आहे.
विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना गाडगे बाबांचे चरित्र व विचार घराघरात गेले पाहिजेत,असे विचार व्यक्त केले..
यावेळी पर्यवेक्षक उत्तम बुधवंत,रामदास कदम, विलास दरेकर,संजय बर्डे,संदीप कोळपे,श्री.विकास व सौ लोखंडे(सांस्कृतिक विभागप्रमुख)संतोष शिंदे, उपस्थित होते.प्रास्ताविक प्रदिप पाडळे,सुत्रसंचालन राजेश पोटे आभारप्रदर्शन किशोर सोलाट यांनी केले.
Related