तालुक्यातील काष्टी येथे नवनाथ बाळासाहेब जामदार या शिपलकर वाडी येथील शेतकऱ्याचे दिनांक २० डिसेंबर,रोजी दुपारी १२ वाजनेच्या सुमारास काष्टी गावातील गोपाळ दूध डेअरीच्या जवळ रोडवर फिर्यादी जामदार यांच्या गाडीतून ड्रायव्हर सीटच्या मागे ठेवलेली,पैशाची पिशवी एका वीस-पंचवीस वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने जबरीने चोरून नेली आहे.
शिपलकरवाडी,श्रीगोंदा येथील नवनाथ बाळासाहेब जामदार वय वर्ष ३५ (धंदा शेती)हे काष्टी गावातील गोपाळ दूध डेअरी जवळ रोडवर थांबले असता, त्यांच्या मालकीची पिकप गाडी क्रमांक एम.एच.१६ सी.सी.५४५५ हिचे उघड्या दरवाज्याच्या मागे ड्रायवरच्या पाठीमागील सीटवर पिशवीत हात घालून, २ लाख ६९ हजार रुपयांची रोख रक्कम,एका अनोळखी २० ते २५ वर्ष वयाच्या इसमाने चोरली आहे.जामदार यांनी याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला फिर्याद नोंद केली असून, त्यानुसार नमूद अनोळखी इसमच्या(ज्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातली) विरोधात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नमूद घटनास्थळी भेट दिली असून,त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार व बीट अमलदार नवले हे पुढील तपास करीत आहेत.
वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता,प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू ,रोख रक्कम तसेच,बाहेर प्रवासास निघताना,आपल्या घराची विशिष्ट काळजी घेण्याचे आवाहन,(पोलिस निरीक्षक)दौलतराव जाधव यांनी यापूर्वी केले आहे.नागरिकांनी अशा घटना टाळण्या साठी खबरदारीच्या उपाययोजना करीत,किमती वस्तूंची काळजी घेणे.गरजेचे असल्याचे,स्थानिक पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे.
साधारण दिवाळी सनापासून पोलीस प्रशासन चोरी संदर्भात खबरदारीच्या सूचना करीत आहे.त्या विषयी पोनि श्रीगोंदा यांनी सामाजिक माध्यमातून केलेले आवाहन..