वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळणे ही काळाची गरज आहे.असे प्रतिपादन श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांनी केले. दिनांक २० डिसेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू माध्य व उच्च माध्य विद्यालय आढळगाव येथे आयोजित वाहतुक व सुरक्षा नियम कायदा या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. पंडीत घोगडे हे होते.
वाहतुकीचे नियम समजावून सांगत असतांना गाडी चालवताना ड्रायव्हींग लायसन, गाडीचे सिट बेल्ट, गाडीचा विमा, रस्ता वाहतुकीचे नियम,सिग्नलचे नियम,झेब्रा कॉसिंग या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले. अल्पवयीन विद्यार्थांने नियममांचे उल्लघंन केल्यास त्याची शिक्षा त्यांचा पालकांना होते.हे ही सांगितले.
यावेळी मंचकावर पर्यवेक्षक शिंदे लक्ष्मण,जेष्ठ शिक्षक जालींदर रामफळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरूकुल प्रमुख अंकुशराज जामदार यांनी केले.तर,आभार दिलीप तुपे यांनी मानले.