सातबारा कोरा करण्याचे अश्वासन फक्त निवडणुक जिंकण्यापुरतेच होते काय? – अनिल घनवट.
दिनांक २२डिसेंबर,श्रीगोंदा:
राज्यातील महाआघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणुक असुन, निवडणुक जिंकण्यासाठी शेतकऱ्यानां खोटी अश्वासने दिली होती काय ? असा सवाल शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत घोषणा केली.३० सप्टेंबर २०१९ पर्यंत “थकबाकीदार” असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपया पर्यंतचे कर्ज माफ करण्याची तयारी महाआघाडी सरकारने दाखवली आहे.सध्या सत्तेत असलेल्या तिनही पक्षांनी आपल्या निवडणुक जाहीरनाम्यात शेतकऱ्यानां संपुर्ण कर्जमुक्त करू व सातबारा कोरा करू अशी अश्वासने दिली होती.युती सरकारच्या कर्जमाफीने पोळलेल्या शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त होण्याची अपेक्षा होती.मात्र,महआघाडी सरकारकडुन अपेक्षा भंग झाला आहे.
या कर्जमाफीचा फायदा फार होणार नाही.कारण मागिल कर्जमाफित काही शेतकरी पात्र झाले. इतारांनी अनेक वेळा पुनर्गठण/ नवेजुने करुन करुन कर्जाची रक्कम दोन लाखा पेक्षा बरीच जास्त झाली आहे.खरिपासाठी घेतलेले कर्जावरचे पीक अतिवृष्टीत वाया गेले आहे. हे कर्ज आज थकबाकीत नाही.पण, पुढच्या वर्षी थकित होणार आहे. सध्या फक्त घोषणा झाली आहे.प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा करतांना काय अटी शर्ती व निकष लावले जातील हे पाहावे लागेल.
निवडणुकीत शेतकऱ्यांचे मते मिळविण्यासाठी सातबारा कोरा करण्यासारख्या घोषणा करुन शेतकऱ्यांची मते मिळविण्याची अनिष्ठ प्रथा बंद झाली पाहिजे.
अतिवृष्टी व दुष्काळमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तातडीने द्यायला हवी होती.तो विषय सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात आला नाही. हे आशचर्यकारक आहे. कर्जमाफीची भिक घालण्यापेक्षा शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. यासाठी काही उपाय योजना होणे आवश्यक होते. त्या दिशेने काही निर्णय झाले नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यवसाय स्वातंत्र्यासाठी नियमनमुक्ती होणे गरजेचे आहे. शेतीवरील निर्बंध हटविण्या ऐवजी साठ्यांवरील बंधने अधिक कसले जात आहेत व खाजगी ट्रॅव्लसच्या बस मधुन शेतीमालाची वाहतुक करण्यावर बंदी घालण्यात येत आहे. शेतीमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबविल्या शिवाय,शेतकरी कर्जफेड करु शकणार हे महाआघाडी सरकारने लक्षात घेणे अपेक्षित आहे.
एकुणच महआघाडी सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली आहे.सातबारा कोरा होण्याचे स्वप्न भंगले आहे. शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमुक्त करण्यासाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु राहील.अशी प्रतिक्रीया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.