चाकूचा धाक दाखवून लुटणारे,दोन सराईत गुन्हेगार श्रीगोंदा पोलिसांकडून अटक..

दिनांक १३ जानेवारी(मांडवगण,श्रीगोंदा):
दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास मांडवगण,तालुका श्रीगोंदा येथे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून,एकूण ३७ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्याचबरोबर बनपिंपरी येथून दिनांक ९ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळेस चाकूचा धाक दाखवून, २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने चोरून नेले होते.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी सहा वाजनेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार,श्रीगोंदा शहरात श्रीगोंदा ते पेडगाव जाणाऱ्या रोडच्या कडेला, हॉटेल नक्षत्र समोर,वरील घटनेतील आरोपी,महेश कीरास चव्हाण राहणार अजनुज,तालुका श्रीगोंदा सुनिल चांगदेव शेलार वय वर्ष २२ राहणार म्हैसगाव, तालुका राहुरी हे चोरीच्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विक्री करण्याकरता येणार आहेत.श्रीगोंदा पोलिसांनी तेथे सापळा रचून,पोलीस ठाण्याचे(सहाय्यक पोलीस निरीक्षक)राजेंद्र सानप,(पोहेको)अंकुश ढवळे,संजय काळे,संजय कोतकर,किरण बोराडे,अमोल कोतकर यांनी या आरोपींना ताब्यात घेऊन,त्यांच्याकडील गुन्ह्यात वापरलेली एक अपाचे कंपनी आरटीआर मोटरसायकल एम.एच.१६- ९४४५ ताब्यात घेत.
img-20200113-wa00543564997244120629720.jpg
त्यांच्याकडून सोन्याचे दागिने,चांदी सदृश्य ५०० ग्रॅम वजनाच्या तेरा प्रकारच्या वस्तू ,२ चाकू अशा एकूण १ लाख २ हजार रुपये किमतीचा चोरी केलेला मुद्देमाल मिळून आल्याने व आरोपींनी पुढील गुन्हे संगनमताने केल्याची कबुली दिली आहे.
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२,४५७,३४ प्रमाणे दोन गुन्ह्यांत नमूद आरोपींना दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी अटक करण्यात आले आहे. या आरोपींची माननीय श्रीगोंदा कोर्टाने तपास कामी दिनांक १५ जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे.
सदरची कारवाई ही(प्रभारी पोलिस अधीक्षक)सागर पाटील,(उपविभागीय पोलिस अधिकारी)संजय सातव,(पोलीस निरीक्षक)दौलतराव जाधव,(प्रभारी पोलिस निरीक्षक)अरविंद माने यांचे मार्गदर्शनाखाली व सूचने प्रमाणे श्रीगोंदा तपास पथकाचे(सहाय्यक पोलीस निरीक्षक)राजेंद्र सानप,(पोहेकॉ)अंकुश ढवळे, संजय काळे,किरण बोराडे,अमोल कोतकर, संजय कोतकर,किरण भापकर,प्रकाश मांडगे यांनी केली आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांनी मदत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास(पोलीस निरीक्षक)यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टेचे(सहाय्यक पोलीस निरीक्षक) राजेंद्र सानप व योगेश सुपेकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading