विजय उमेदवारांचे भारताच्या संविधानातील उद्देशिका देऊन सत्कार..
विकास कामाची झळ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू द्या:संतोष भोसले.
दिनांक १४ जानेवारी,(लोणी व्यंकनाथ,श्रीगोंदा):
लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत ४ उमेदवारांनी फॉर्म भरले.परंतु मी व संतोष माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि समोरासमोर लढत स्वप्निल गायकवाड व रामदास ठोंबरे यांच्यात होती.या लढतीत रामदास ठोंबरे विजय झाले.ते लोकनियुक्त सरपंच म्हणून लोणी ग्रामपंचायत मध्ये दुसरे सरपंच निवडून आले.स्वप्निल व संतोष हे दोघेही माझे मित्र आहेत.परंतु निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरल्या पासून तर त्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंतच कोणत्याही पक्षात किंवा व्यक्तींमध्ये विरोध असावा. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणेच रोष विसरून एकमेकांसोबत राहून मिळून मिसळून गावच्या हितासाठी गावच्या विकासासाठी काम केले पाहिजेत आणि म्हणूनच मी संतोष भोसले ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या वतीने भारताच्या संविधानातील उद्देशिका देऊन मा.श्री बाळासाहेब जी नाहाटा ,लोकनियुक्त सरपंच रामदास ठोंबरे ,व वार्ड क्रमांक चार मधून निवडून आलेले सदस्य पदाचे उमेदवार संदीप गाडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना संतोष भोसले म्हणाले की,सरपंच कोणत्याही पक्षाचा असावा?परंतु,विकास मात्र सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे.त्यांच्या झोपड्यांच्या जागी,जागे सहित पक्के घर तयार करून द्यावे आणि ज्या परिस्थितीमुळे मला सरपंच पदाची उमेदवारी मिळाली नाही.ही परिस्थिती आमच्या समाजातील दूर करून पुन्हा एक काळ असा येऊ द्या. की,आमच्या समाजातील कोणालाही सहज उमेदवारी गावातील प्रतिष्ठित पक्षाकडून मिळाली पाहिजेत.तरच खरा गावचा विकास झाला ,आणि तश्या विकासाची झळ आमच्या पर्यंत पोहोचू द्या असे मला वाटते.
साहेब बोलताना म्हणाले की,सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राजकारण करताना त्यांचा नेहमीच विचार केला जाईल सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत मी माझा लढा चालूच ठेवणार आहे माझ्याकडे माझ्या पक्षाचा किंवा समोरच्या पक्षाचा कोणताही व्यक्ती कामानिमित्त आला तरी मी त्यांच्यात काडीमाञही भेदभाव करणार नाही गावचा विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे.
यावेळी शिवाजीराव(अण्णा) जाधव ,ज्ञानदेव (माऊली) मगर भगवान गोरखे ,बाळासाहेब नाहाटा, शेख सर, विक्रमसिंह जाधव, संदीप गाडे ,संतोष माने ,आप्पा कांडेकर, शांतीलाल मदने ,राजू भोसले ,ज्योती भोसले ,छाया भोसले ,रंगनाथ म्हस्के ,पोपट तांबोळी ,सुनील खंडागळे, दत्तात्रय मदने ,विठ्ठल लोखंडे ,नारायण साळवे ,रमेश गोरखे ,बबन लहाने ,संजय गोरखे, आशिष लडकत गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीलाल मदने तर,आभार संतोष भोसले यांनी मानले.