श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव गावात भीमा नदीपात्रात चालू असलेला,अनधिकृत वाळू उपसा संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार,वाळू वाहतूक करणारा डंपर गुन्हे शाखेने पकडला असून,त्यावर कारवाई करीत ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १९ जानेवारी रोजी पोहेकॉ.विजयकुमार वेटेकर, विश्वास बेरड व जालिंदर माने(स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर)असे खाजगी वाहनाने श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील पाहिजे व फरार आरोपी शोध घेत असताना,विजयकुमार वेटेकर यांना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की,(पेडगाव,तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर)पेडगाव ते श्रीगोंदा जाणारे रोड ने एक पांढर्या रंगाचा डंपरमध्ये वाळू भरून चोरून वाहतूक करीत आहेत.त्यानुसार दोन पंचासमवेत पोकॉ.विकास वैराळ यांनी नमूद ठिकाणी पेडगावच्या शिवारात,पेडगाव बसस्थानका समोर जाऊन सापळा लावला.थोड्यावेळाने नमूद ठिकाणी बातमीप्रमाणे एक पांढरा रंगाचा डंपर जुने पेडगाव कडून बस स्थानकाच्या दिशेने येताना दिसला.पोलीस व पंचासमक्ष तीन वाजून वीस मिनिटांचे सुमारास छापा टाकून,डंपर थांबण्याचा इशारा केला.नमूद वाहनावरील चालकास वाळू वाहतुकीचा परवाना बाबत विचारपूस केली असता.त्यांनी कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगितले.
त्यानुसार सदर पकडलेल्या वाहनाची दोन पंचा समक्ष पाहणी करत,९ लाख रुपयांचा टाटा कंपनीचा एम. एच.१६सी.सी.५४४४ व ३० हजार रुपये किमतीची तीन ब्रास प्रशासकीय वाळू असे एकूण ९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणण्यात आला.ट्रक चालक विनोद किसन आधोरे यावर भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.