श्रीगोंद्यात १ कोटी ३३ लाखांच्या बंधाऱ्याच्या कामास प्रारंभ. : बबनराव पाचपुते

दिनांक २० जानेवारी,श्रीगोंदा :
श्रीगोंद्यात १ कोटी ३३ लाखांच्या बंधाऱ्यांच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील औटीवाडी, वाण्याचा मळा, हिरडे मळा व भोळे वस्ती येथे हे नियोजित बंधारे असून,याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते यांनी केले.
वरील बंधाऱ्यांचे भूमीपुन पाचपुते यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. औटीवाडी – १५ लक्ष, वण्याचा मळा ३८ लक्ष, हिरडे मळा – ४४ लक्ष, भोळे मळा – ३६ लक्ष. या चार बंधाऱ्यांचे मिळून एकूण १ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी असल्याचे सांगून श्री. पाचपुते म्हणाले, ” पाझर तलाव, नाला बंडीग चे कामे झालेत मात्र छोटे बंधारे करणे सुद्धा गरजेचे होते. या बंधाऱ्यांमुळे पूर्ण पाणी अडविले जाईल. आगामी काळात जलयुक्त शिवार योजनेतुन या बंधाऱ्यांची खोली वाढविण्याचे सुद्धा काम करावे लागणार आहे. श्रीगोंद्या लगत असणाऱ्या या बंधाऱ्यांचा वाडी-वस्ती वरील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.”
यावेळी बापूसाहेब गोरे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, नगरसेवक संग्राम घोडके, एम. डी. शिंदे, नंदकुमार लाढाने, संतोष क्षीरसागर, अंबादास औटी, मारुती औटी, नानासाहेब कोथिंबीरे, राजेंद्र उकांडे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करू नये : पाचपुते
प्रा.राम शिंदे पालकमंत्री असताना आपण १३ बंधाऱ्यांसाठी साडे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हे काम सुरू करण्यासाठी अडचणी आल्यामुळे कामास विलंब झाला. रायकर मळ्यात ही ८७ लाखांच्या बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहेत. कामाच्या बाबतीत मागे राहणार नाही. शेतकऱ्यांचा कोणीही बुद्धिभेद करू नये – बबनराव पाचपुते (आमदार, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading