लाखोंची फसवणूक करून पसार असलेला आरोपी, पोलिसांच्या ताब्यात..

४ लाख १५ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त..

दिनांक २२ जानेवारी श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील गुरुमाऊली झेरॉक्स सेंटर मधून दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी दुकान मालक बापूसाहेब छगन शेळके यांच्यासोबत विश्वास संपादन करीत,दिलीप शंकर शिंदे या खोट्या नावाने श्रीगोंदा येथे वास्तव्य करून, खरे नाव लपवित मित्राच्या स्कोडा गाडीत झेरॉक्स सेंटर मधील कॉम्प्युटर झेरॉक्स मशीन,प्रिंटर रोख रक्कम १ लाख रुपये व एक हिरो कंपनीची नवीन पॅशन प्रो मोटरसायकल चोरून नेली होती.याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे येथे भादवि कलम ४२०,४०६ व ३४ प्रमाणे या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद प्रकरणी तपास चालू होता.मात्र पोलिस प्रशासनास यश येत नव्हते.
दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी या गुन्ह्यातील आरोपीचे मूळ नाव व पत्ता मिळवण्यात श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे(सहाय्यक पोलीस निरीक्षक)सानप,(पोलीस हेडकॉन्स्टेबल)अंकुश ढवळे,मांडगे,काळे,इंगवले,देवकाते,सुपेकर यांना यश मिळाले.त्यावरून नमूद आरोपीचा शोध घेण्यात आला.त्यानुसार आरोपी प्रसाद राजधर फसले वय वर्षे २४ राहणार यशवंतनगर,पैठण,तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यास ताब्यात घेऊन,गुन्ह्यात वापरलेली स्कोडा गाडी क्रमांक एम.एच.०४,डी.डब्ल्यू. ५५३४ सह झेरॉक्स सेंटर मधील चोरून नेलेली झेरॉक्स मशीन,कॉम्प्युटर,दोन नवीन मोबाईल,पॅशन प्रो.ही हिरो कंपनीची नवीन मोटर सायकल असा ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नमूद आरोपीने अनेक जणांची यापूर्वीही फसवणूक केली असल्याचे तपासात निदर्शनास येत आहे.आरोपीवर मुकुंदवाडी पोलीस ठाणे,औरंगाबाद येथेही फसवणुकी सह इतर गुन्हे दाखल आहेत.सदर रेकॉर्डवरील आरोपीने आणखी कुठे गुन्हे केले आहेत?याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
सदरची कारवाई सागर पाटील(पोलिस अधीक्षक अहमदनगर),संजय सातव(उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत भाग कर्जत),(पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे(सपोनि)सानप,पोहेकॉ अंकुश ढवळे,मांडगे,इंगवले,काळे,देवकाते,सुपेकर,प्रशांत राठोड(मोबाईल सेल)यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading