श्रीगोंदा येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस चांगला प्रतिसाद..
दिनांक २१ जनेवारी,श्रीगोंदा:
पल्स पोलीओ लसीकरण मोहीम ही आपल्या सर्वांची मोहीम व जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.0 ते 5 वर्षे पर्यंत वय असलेल्या बालकांच्या पालकांनी जातीने लक्ष देऊन लसीकरण करुन घेतले.तर,पोलीओचे निश्चित उच्चाटन होईल.असा विश्वास अल्पसंख्यांक विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शकीलभाई शेख यांनी व्यक्त केले.
शेख यांच्या हस्ते श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात बालकांना पोलीओ डोस देण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप डफळ,डॉ.सुषमा जनजीरे यांच्या सह डी.आर.मेटे, एस.के.बनसोडे आदी सहकारी येथे उपस्थित होते.लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे डॉ.जनजीरे यांनी यावेळी सांगितले.