चित्रकला स्पर्धत शिंदे विद्यालयाचा १०० टक्के निकाल..
दिनांक २५ जानेवारी(शिंदे,कर्जत):
रयत शिक्षण संस्थेचे”न्यू इंग्लिश स्कुल शिंदे”या विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजीट शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० टक्के लागला आहे.धनश्री सुद्रीक ‘अ’ श्रेणी मिळवली असून, उज्जवला घालमे,श्रावणी घामले,वैष्णवी घालमे,सानिया शिंदे,वैष्णवी शिंदे,सोनाली घालमे,संदिपा घालमे यांनी ‘ब’श्रेणी मिळवली आहे.
सर्व विद्यार्थांना विद्यालयाचे कला शिक्षक पवार धनेश यांचे मार्गदर्शन मिळाले असून, विद्यार्थांचे व शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक गोसावी एम.व्ही.स्कुल कमिटी सदस्य रुपचंद (आण्णा) घालमे व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.