प्रजासत्ताक दिनी पोलीस अधिकारी दौलतराव जाधव यांचा पालक मंत्र्याकडून सन्मान..
प्रजासत्ताक दिनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब,सामाजिक कार्यकर्ते संतोष बोळगे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान..
दिनांक २७ जानेवारी(श्रीगोंदा):-
प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी अहमदनगर पोलीस मुख्यालयात सकाळी झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड आणि चांगली प्रशासकीय कामगिरी केल्याबद्दल मंदार मल्लिकार्जुन जवळे (उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग), दिलीप शिशुपाल पवार ( स्थानिक गुन्हे शाखा, पोलिस निरीक्षक) यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री हसन मुश्रिफ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जि.प.अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके आदि उपस्थित होते.
अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये याप्रमाणे श्रीहरी रामचंद्र बहीरट (पोलीस निरीक्षक,श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे),अरुण भागीरथ परदेशी (पोलीस निरीक्षक,सायबर पोलीस ठाणे),दौलतराव शिवराम जाधव (पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा पोलीस ठाणे), संदिप भगवान पाटील (स.पो.नि.स्थानिक गुन्हे शाखा), पवन शंकर सुपनर (पो.उ.नि. एमआयडीसी पोलीस ठाणे, अ.नगर), पोहेकाँ मनोहर सिताराम गोसावी ( स्थानिक गुन्हे शाखा), पोहेकाँ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे (स्थानिक गुन्हे शाखा), पो.ना. रविंद्र आबासाहेब कर्डिले (स्थानिक गुन्हे शाखा), पो.ना. संदीप कचरु पवार (स्थानिक गुन्हे शाखा), पोहेकाँ जालिंदर काशिनाथ लोंढे (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोकाँ किशोर सुभाष जाधव (श्रीरामपूर, शहर पोलीस ठाणे), पोहेकाँ योगेश मनोहर गोसावी (सायबर पोलीस ठाणे), पोकाँ अभिजित दत्तात्रय आरकल (सायबर पोलीस ठाणे), पोकाँ राहुल नरसय्या गुंडू (सायबर पोलीस ठाणे), पो.ना संदीप विक्रम चव्हाण (एमआयडीसी पोलीस ठाणे), पो.ना विजय विठ्ठल नवले (एमआयडीसी, पोलीस ठाणे), पोकाँ रशिद बादशहा शेख ( राहाता, पोलीस ठाणे), पोकाँ अजित अशोक पटारे (राहाता, पोलीस ठाणे), संतोष ज्ञानेश्वर बोळगे (श्रीगोंदा) आदिंचा सन्मान करण्यात आला.