वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दारू बंदीची तक्रार केल्याने,तक्रारदार वडिलांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी,अल्पवयीन मुलावर श्रीगोंदा पोलिसांची कारवाई…

पी.एस.आय.पाटील,पोकॉ वैराळवर कारवाई करण्याची मागणी..अन्यथा आंदोलन करणार: बापू माने..

दिनांक २९ जानेवारी श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील शनिचौक परिसर कैकाडगल्ली येथे वास्तव्यास असणारे बापू माने यांनी त्यांच्या घराच्या आसपास चालू असलेले अवैध दारू विक्री बंद करण्याविषयी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला वारंवार सूचना व तक्रारी केल्या.मात्र,कारवाई होत नसल्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी व अधीक्षक कार्यालय यांच्याकडे फोन करून दारू बंद करणे विषयीची माहिती दिली.याचा राग अनावर होऊन,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.पाटील यांनी बापू माने यांचा मुलगा उदय माने यास घराच्या समोर लावलेली गाडी जबरदस्तीने बाहेर काढन्यास सांगून त्याच्या बरोबर शेजारी बसून गाडी पोलीस ठाण्यात जमा केली.तशेच,चार चाकी वाहन चालवतो म्हणून, मोटारवाहन अधिनियम कायद्याअंतर्गत बनावट गुन्हाही दाखल केला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे केलेल्या अर्जामध्ये बापू माने यांनी वरील नमूद अधिकाऱ्यांनी आम्हांला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याने.पाटील व वैराळ वर कायदेशीर कारवाई करा.अन्यथा,बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२० पासून पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर यांचे समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
(सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झाली ही घटना):
अवैद्य व्यवसाय बंद करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून स्थानिक पोलिस प्रशासन कारवाई करत नसल्याचे कळवले होते.यानंतर दोन दिवसांनी दिनांक २७ जानेवारी रोजी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. पाटील हे मानेंच्या घराशेजारील हॉटेल विश्वदीप मध्ये सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास आले. तेथे येऊन त्यांनी बापू माने यांच्या घरावर पहारा देण्यास सुरुवात केली.ते सारखे हॉटेलमधून बाहेर येऊन घराकडे डोकावत होते.काही वेळा हॉटेलमधील वेटर घरात डोकवण्यास आला.त्यानंतर पाटील साहेब स्वतः घरासमोर उभे राहिले.त्यांनी मानेंचा मुलगा उदय याला बोलावून घेतले व त्याला बळजबरीने शेड मध्ये उभी असलेली चारचाकी नवी गाडी टाटा हरिअर बाहेर घेण्यास सांगितले.उदय ने गाडी बाहेर घेतली. पाटील साहेब स्वतः गाडीत बसले व गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
घडलेला सर्व प्रकार शेजाऱ्यांकडून कळाल्यानंतर बापू माने यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जाऊन विचारपूस केली असता,तू कंट्रोल रूमला तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करतो.तुझी गाडी सोडत नाही. तुला काय करायचे ते करून घे.म्हणून अंगावर पेन फेकत सही करण्यास सांगितले.पोलिसांनी दमबाजी करीत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे बापू माने यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पोलीस श्रीगोंदा शहरात अवैधरित्या चालू असलेले धंदे बंद करण्यास उदासीन असल्याचे या घटनेवरून समोर येत आहे.शिवाय कोणी तसा आग्रह केला?तर, त्यांना खोट्या गुन्ह्यांत गुंतवण्यास पोलीस यंत्रणा मागे पुढे पाहत नाही.हेही स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading