बाबासाहेबांच्या सांस्कृतिक भवनाचे काम तात्काळ सुरु करा- धनंजय मुंडे..
व्हायरल न्यूज:
दिनांक ३० जानेवारी मुंबई:
मिरा भाईंदर व ठाणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला आवश्यक परवानगी व निधी देण्यात आला असून,या भवनाचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
मीरा भाईंदर व ठाणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली.त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.
मुंडे म्हणाले, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर सर्वे क्र. २३३,३८०० चौ.मी.जागेवर सांस्कृतिक भवन,विपश्यना केंद्र व बहुउद्देशीय इमारत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.मीरा भाईंदर येथील सांस्कृतिक भवनाला १२ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे.