खुशखबर ! १५ फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात २००० रुपये पोहचणार, आपले नाव असे चेक करा.

व्हायरल न्यूज.
दिनांक ३० जानेवारी,नवी दिल्ली:
केंद्र सरकारने आपले वचन पूर्ण करीत देशभरातील ६ कोटी शेतकऱ्यांना १२,००० कोटी रुपये दिले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जानेवारीच्या सुरूवातीला ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील तिसर्‍या ग्लोबल बटाटा कॉन्क्लेव्हमध्ये असा दावा केला की, एवढी मोठी रक्कम हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने ही शासन पातळीवरील नवीन नोंद आहे.गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून,केंद्र सरकारने गेल्या वर्षी प्रधानमंत्री-किसान योजना सुरू केली होती. हे स्पष्ट केले. जर आपणास आपले नाव तपासायचे असेल.तर,आपण आपल्या कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ शकता.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply