दिनांक १ ऑक्टोबर २०२५,मुंबई:
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख निश्चित झाली असून, ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेण्यास सुरुवात करेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर काही दिवसांतच तो संपूर्ण राज्यातून माघार घेईल.

दरम्यान, २ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांचा समावेश असेल. हा पाऊस प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहणार असून तो दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे.

- सर्वाधिक धोका विदर्भात: वादळी पावसाचा सर्वात अधिक धोका विदर्भात जाणवेल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- सध्याची स्थिती: २९ सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे.
- हवामान स्थिर कधी होणार? ७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान पुन्हा स्थिर होण्यास सुरुवात होईल.
कृषी विभागाचे आवाहन:
या काळात शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यावी. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
स्रोत: (जिल्हा माहिती अधिकारी)


Advertise..
