जिल्ह्यात २२ मृत्यू, ५,६९७ घरांचे नुकसान, श्रीगोंदा तालुक्यात १ मृत्यू आणि २४९ घरांची पडझड. अहिल्यानगर जिल्ह्याला मान्सूनचा तडाखा..

दिनांक १३ ऑक्टोबर २०२५, श्रीगोंदा/अहिल्यानगर:

अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत मान्सूनपूर्व आणि परतीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यात एकूण २२ जणांचा मृत्यू झाला, तर ५ हजार ६९७ घरांची पडझड झाली.

जिल्हा प्रशासनाने संकलित केलेल्या माहितीनुसार, लहान-मोठे असे १ हजार ५९ जनावरे आणि १३ हजार ८७९ कोंबड्या दगावल्या आहेत.

जिल्ह्यास बसलेल्या या अतिवृष्टी, पूर आणि वादळी पावसाच्या तडाख्यात सर्वाधिक घरांचे नुकसान पाथर्डी तालुक्यात (१,०२० घरे) झाले, तर जामखेड तालुक्यात ९०६ घरांची पडझळ झाली.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार, श्रीगोंदा तालुक्यात या पावसाने १ व्यक्तीचा बळी घेतला, तर २४९ घरांचे नुकसान झाले आहे. तसेच, दगावलेल्या जनावरांची संख्या श्रीगोंदा तालुक्यात २२ आहे. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ४१८ जनावरे दगावली, तर नगर तालुक्यात २९२ जनावरे दगावली आहेत.

मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या:

नगर (३), जामखेड (२), अकोले (१), कर्जत (१), नेवासा (३), पाथर्डी (३), राहुरी (१), संगमनेर (३), शेवगाव (२), श्रीगोंदा (१), राहाता (२) अशी आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading