तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तहसील प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारताना होगले भाऊसाहेब व निवेदन देतांना लोकाधिकार संघटनेचे पधाधिकारी
दिनांक ६ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
निर्भया हत्याकांड दिल्ली,हैदराबाद येथील प्रियंका रेड्डी प्रकरण,आणि आत्ताचे हिंगणघाट जळीत प्रकरणातील एका शिक्षिकेला जाळले. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंधारे गावात एका महिलेवर रॉकेल टाकून पेटवून टाकण्याचा प्रकार घडला.
अशा कित्येक घटना या जगात घडत आहेत .त्यामुळे आज असा प्रश्न पडत आहे की आजची महिला खरंच सुरक्षित आहे का ?असा सवाल लोकाधिकार आंदोलन या संघटनेच्या वतीने आम्ही आज शासनाला विचारण्यात आला.याविषयी श्रीगोंद्याचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून,ती मृत्यूशी झुंज देत आहे.नागपुरातील ऑरेंज सिटी दवाखान्यात नमूद महिलेवर उपचार चालू आहेत.४०% भाजल्याने गळ्याच्या आतील भाग पूर्णपणे जळाला आहे.त्यामुळे महिलेची वाचा गेल्याचे डॉक्टरने सांगितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे या महिलेवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला ही महिला व्यवसायाने शिक्षिका आहे. या महिलेचा मृत्यूशी संघर्ष सुरू असून ही महिला ४०% जळालेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तीचा चेहरा,डोक्यावरील केस आणि फुफ्फूसाकडील काही भाग जळाला असून,तिची दृष्टी आणि वाचा जाण्याची शक्यता वैद्यकीय निरीक्षनातून डॉक्टरांनी सोमवारी व्यक्त केली होती.
या घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालू व्हावे, पीडितेला जलद गतीने न्याय मिळावा तसेच आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी.अशी मागणी या घटनांचा निषेध म्हणून तहसिलदार प्रतिनिधींना निवेदन देऊन लोकाधिकार आंदोलन या संघटनेतील संतोष भोसले, भिंगार दिवे सचिन,मनीषा काळे,सागर भांगरे,जालिंदर शिंदे ,छाया भोसले ,उज्वला मदने ,सुनिता बनकर, राऊत रोहिणी,अजय काळे, यशोदा काळे यांनी केले आहे. वरील दोन घटनांवरून महिलांनी अजून किती अन्याय सहन करायचा हा प्रश्न समोर आला आहे?तसेच अत्याचार करणाऱ्या लोकांना आपल्या न्यायव्यवस्थेचा धाक राहिला नाही का ? हाही प्रश्न उपस्थित होत आहे.तरी पीडितांना लवकरात लवकर योग्य तो न्याय देऊन आरोपींना कडक शिक्षा करावी याविषयीचे निवेदन लोकाधिकार आंदोलन संघटनेने प्रशासनास दिले आहे.