“विद्या भांडवलकर” यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पी.एच.डी जाहीर.

दिनांक ७ फेब्रुवारी,श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील निवृत्त पाटबंधारे कर्मचारी,रत्नाकर भांडवलकर यांच्या कन्या विद्या रत्नाकर भांडवलकर यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पी.एच.डी जाहीर झाली आहे.त्यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेंतर्गत ‘अ स्टडी ऑफ ट्रेनिंग अँँड डेव्हलपमेंट प्रॅक्टीसेस फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज विथ स्पेशल रेफरन्स टू रांजणगाव अँँड सणसवाडी इंडस्ट्रीयल एरिया इन पुणे’ याविषयावर प्रबंध सादर केला. भोर येथील अनंतराव थोपटे कॉलेजचे प्राचार्य डॉ.प्रसन्न कुमार देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
विद्या यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे झाले असून,कृषी पदवी पुण्याच्या अँँग्रीकल्चरल महाविद्यालयात घेतली आहे.त्या सध्या ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग वाघोली,येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.त्यांचे पती सुधीर डेरे ‘सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे’ वरिष्ठ अधिकारी असून,त्यांनी विद्या यांना प्रोहत्सान दिले.विद्या यांचे मा.आ.राहुल (दादा) जगताप,(जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक) सुर्वे साहेब ,(अधीक्षक अभियंता) हेमंत धुमाळ यांचे सह सहकारी व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading