सख्या भावाला रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न..

दिनांक ६ फेब्रुवारी (काष्टी,श्रीगोंदा):
पोलिस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणा वरून,काष्टीत सख्या भावास जिवंत जाळण्याची घटना घडली आहे.
२८ जानेवारीच्या रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास पांडुरंग अंकुश खोरे (वय ३२,रा.काष्टी, तालुका,श्रीगोंदा) याने दत्तात्रय अंकुश खोरे याच्या विरूध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७ प्रमाणे फिर्याद दिली होती.त्याचा राग अनावर होऊन, दत्तात्रय खोरे याने भावाला पोलिसात दिलेली फिर्याद काढुन घे.म्हणत,अनिल महादेव मगर(गार,ता.श्रीगोंदा) आणि एक अनोळखी इसम यांनी पांडुरंग खोरे याला मारहाण करीत जबरीने रॉकेल पाजले.तसेच अंगावर ओतले.पांडुरंग रॉकेलने पुर्ण भिजल्यानंतर अश्लील शिव्या देत,दत्तात्रयने स्वतःच्या भावाला पेटवुन दिले. यामध्ये पांडुरंग हा गंभीररित्या भाजला असून, त्याला जिल्हा शासकीय रूग्णालय,अहमदनगर येथे उपचारा साठी दाखल करण्यात आले आहे.मात्र प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पांडुरंग खोरे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय खोरे यांच्यासह तिघां विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास(सपोनि)सानप करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading