भाजप सरकार हे जनतेच्या हिताचे: जिल्हाध्यक्ष मुंडे.
दिनांक ६ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
भाजपचे केंद्रातील सरकार हे जनतेच्या हिताचे सरकार असून,राष्ट्रीय नागरिकत्व कायदा हा सर्वांच्या फायद्याचा आहे.पण,काँग्रेस व आघाडीचे सरकार हे भाजपच्या विरोधात रान उठवत आहेत.असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा येथे केले.
नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून अरुण मुंडे यांचा श्रीगोंदा येथे भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले श्रीगोंदा तालुका हा अतिशय चांगला तालुका म्हणून ओळखला जातो.हा तालुका राज्याला मार्गदशर्न करणारा तालुका आहे.या तालुक्यात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्याचे मोठे कर्तृव आहे. सध्या देशात भाजपचे सरकार असून,त्यांनी नागरिकत्व कायदा आणला आहे.हा कायदा सर्वांच्या फायद्याच आहे.पण,काँग्रेस व आघाडी सरकार हे चुकीचा प्रचार करत आहेत. भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.असे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी यावेळी केले.