राष्ट्रसंत शेख महंमद बाबा यात्रा उत्सवात अपेक्षित सुधारणा संदर्भात,ट्रस्ट,सह प्रशासनास निवेदन सादर.

दिनांक ५ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
मागील अनेक वर्षापासून यात्रा उत्सवात सुधारणा व्हाव्यात,यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील आहे. राष्ट्रसंत शेख महंमद बाबा हे समस्त मानवजातीचे श्रद्धास्थान आहेत.सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवापूर्वी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. या मध्ये अनेक वर्षांपासून ज्ञानेश्वरी वाचन केली जाते.
याबरोबरच यात्रा उत्सवात काही बाबींचा विचार करणे गरजेचे असून,त्या अंमलात याव्यात यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांचे सह पदाधिकाऱ्यांनी १) मा.नगराध्यक्षा,न.प.श्रीगोंदा २) मा. मुख्याधिकारी, न. प. श्रीगोंदा ३) मा. पोलीस निरीक्षक, श्रीगोंदा ४) अध्यक्ष, श्री शेख महंमद महाराज देवस्थान प्रतिष्ठान, श्रीगोंदा ५) अध्यक्ष, ह. शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट,श्रीगोंदा यांना याविषयीची निवेदन सादर केले आहे.
त्यात नमूद करण्यात आलेले विषय १.या वाचनासोबत राष्ट्रसंत शेख महंमद बाबा यांचे योगसंग्राम या ग्रंथाचे पारायण करायला हवे,२. या सप्ताहमधील प्रवचंनामध्ये विविध संत चरित्रावर प्रवचन करायला हवेत जेणेकरून संत साहित्य व विचार धारा यांवर प्रकाश टाकता येईल.,३. CCTV कैमरा यंत्रणा यात्रा उत्सवातील महत्वाच्या ठिकाणी बसवण्यात यावेत.,४. यात्रा परिसर व पाळणे इ. महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी प्रचंड धूळ निर्माण होत असल्याने,पाणी मारून व चटई टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी.,५.पाळणे दरासंदर्भात तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली जाते.परंतु,पाळणा मालक ठरल्या प्रमाणे न वागता सदर नियम अटी पायदळी तुडवतात.यात्रे दिवशी मनानी पद्धतीने दर आकारले जातात.यासाठी ठरलेले दर प्लेक्स वर दर्शनी भागात लावावेत.सदर बैठक ही इन कॅमेरा झाली पाहिजे या बैठकीचे इतिवृत्त तहसीलदार साहेब यांच्या सहीने पारीत करावे.,६. यात्रा नियंत्रण करण्यासाठी नियंत्रण कक्ष तहसील कार्यलय परिसरात कार्यनवीत करावा.,७.येणाऱ्या भविकांसाठी पार्किंगची मोफत सोय झाली पाहिजे.,८.यात्रेत येणाऱ्या भाविक व व्यावसायिकान साठी पिण्याचे व वापरन्यासाठी पाणी उपलब्ध करण्यात यावे.,९. यात्रा उत्सव खर्च हिशोब अहवाल छापील असावा.तसेच,तो वर्गणी धारकास देण्यात यावा.,१०. समाधी स्थळाचे मूळ स्वरूपामध्ये बदल करण्यात येऊ नये.पूर्वी होते त्या प्रमाणेच रंगकाम करण्यात यावे.,११. पाळणा जागा भाडेकरार / व्यवहार यामधील येणारी काही रक्कम बाबांच्या समाधीस्थळावर डागडुजीसाठी तातडीने खर्च करण्यात यावी.असे निवेदन कर्त्यांचे म्हणणे आहे.
सदर निवेदन देते वेळी सतीश बोरुडे, युवराज चिखलठाणे, दिलीप लबडे ,युवराज पळसकर,राजेंद्र राऊत,टिळक भोस,शिवाजी फंड सह देविदास माने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading