हिंगणघाट जळीत प्रकरण; ‘त्या’ पीडितेची मृत्यूशी झुंज; वाचा गेली, दृष्टी झाली अंधूक.

व्हायरल न्यूज:
दिनांक ५ फेब्रुवारी,नागपूर :
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक असून,ही महिला मृत्यूशी झुंज देत आहे. नागपुरातील ऑरेंज सिटी इस्पितळात या महिलेवर उपचार सुरू आहेत. चाळीस टक्के भाजलेल्या या महिलेच्या गळ्याच्या आतील भाग पूर्णपणे जळाला आहे. त्यामुळे महिलेची वाचा गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे या महिलेवर चक्क पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. ही महिला व्यवसायाने शिक्षिका आहे. या महिलेचा मृत्यूशी संघर्ष सुरू असून ही महिला ४० टक्के जळाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पीडितेचा चेहरा, डोक्यावरील केस आणि फुफ्फुसाकडील काही भाग जळाला असून तिची दृष्टी आणि वाचा जाण्याची शक्यता वैद्यकीय निरीक्षणातून डॉक्टरांनी सोमवारीच व्यक्त केली होती.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading