हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकरांच्या पायांचे पूजन केले पाहिजे’
व्हायरल न्यूज:
दिनांक ५ फेब्रुवारी,पुणे :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हिंदू मॅरेज बिल’ याचा आग्रह धरला नसता तर आज हिंदू स्त्रियांचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी दररोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे. तसेच आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिली नाही, याचेही सर्व हिंदूंनी आयुष्यभर आभार मानले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी केले.
स्वा. सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी सु. ह. जोशी, विद्याधर नारगोलकर, दिलीप पुरोहित, आरती दातार, वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीतर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.